28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईधक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

धक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

गेल्या काही दिवसांपासून लावणी डान्सर गौतमी पाटील खूप चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकप्रिय लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. एका कार्यक्रमात ती चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे चित्रीकरण केले होते आणि तो व्हिडिओ लीक केला.  तिच्या गटातील एका सदस्याने पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354-सी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली आहे. (Lavani dancer Gautami Patil’s MMS leaked)

“लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे”, असं चाकणकर यांनी सांगितलं.

दरम्यान, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाकडून सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरवर याबाबतची माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा :

मुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी केली थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिलांची गैरसोय; शिवसेनेकडून तक्रार पत्र दाखल

अरेरे!! रुपालीताई, राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय? 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी