29 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरमुंबई'लय भारी'फेम अमेय खोपकरांची 'कलावती' येतेय सिनेरसिकांच्या भेटीला

‘लय भारी’फेम अमेय खोपकरांची ‘कलावती’ येतेय सिनेरसिकांच्या भेटीला

‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणारे अमेय विनोद खोपकर सिनेरसिकांसाठी नवीन कलाकृती सादर करणार आहेत. त्यांचा ‘कलावती’ हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच सिनेमागृहांत पाहायला मिळणार आहे. आज २६ फेब्रुवारी, रविवारी दुपारी १२.५१ मिनिटांनी जुहू तारा रोड येथील ‘आजीवसन’ स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या मुहूर्ताचा शुभारंभ होणार आहे. (‘Lay Bhari’ fame Amey Khopkar’s ‘Kalavati’ is coming)

('Lay Bhari' fame Amey Khopkar's 'Kalavati' is coming

‘दुनियादारी’, प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘फक्त लढ म्हण’, ‘तू ही रे’ यांसारख्या चित्रपटांचे दिगदर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी हे या ‘कलावती’चे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता असणार आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट अँड ब्लॅक रोज फिल्म हा चित्रपट सादर करत आहेत. प्रजय कामत आणि स्वाती खोपकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते अवधूत गुप्ते या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंकज पदघन यांनी हा चित्रपट संगीतबद्ध केला आहे. अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरीश दुधाने, ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे, जय दुधाने, निल सालेकर या प्रसिद्ध सिने कलाकारांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना ‘कलावती’मध्ये पाहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी