28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईखासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून एका महिलेकडून आरोप करण्यात येत आहेत. या महिलेने केलेले सर्व आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी खोटे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शनिवारी सदर महिलेविरोधात राहुल शेवाळे यांच्या नावाची बदनामी केल्याप्रकरणी एफआयआर देखील नोंदविण्यात आली. परंतु आता सदर महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहीत न्याय मागितला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर सदर महिलेविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ‘माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही,’ असे या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे. त्यामुळे या महिलेविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर सत्याचा विजय झाला असे म्हणणारे खासदार राहुल शेवाळे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

सदर महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात राहुल शेवाळे यांनी त्या महिलेला कसे फसवले? याबाबत देखील नमुद केले आहे. लग्नाचे कारण पुढे करत राहुल शेवाळे यांनी 2020 पासून माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्यांचा त्यांच्या पत्नीसोबत लवकरच घटस्फोट होणार आहे. त्या दोघांमध्ये काहीही ठीक नसल्याचे राहुल शेवाळे यांच्याकडून सांगण्यात येत होते. अशी माहिती देखील सदर महिलेने या पत्रात लिहिली आहे.

दरम्यान, आता या महिलेच्या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल शेवाळे यांच्यावर नेमकी काय कारवाई करतात? किंवा या प्रकरणात आणखी काय उलगडे होतात? हे पाहावे लागणार आहे. पण राजकीय नेते आणि त्यांची महिलांची प्रकरणे ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नसली तरी, महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिमा फासणारी नक्कीच आहेत.

हे सुद्धा वाचा :

खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

किरीट सोमय्यांना शिवसेनेतील माहिती पुरवणारा ‘खबरी’ कोण ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी