30 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरमुंबईठाण्यातल्या कैद्यांचा रक्षाबंधन तुम्ही पाहिलात का?

ठाण्यातल्या कैद्यांचा रक्षाबंधन तुम्ही पाहिलात का?

रक्षा बंधनाचा सण देश पातळीवर साजरा झाला. राजकीय नेते, उद्योजक, अभिनेते-अभिनेत्री, गरीब-श्रीमंत, हिंदू- मुस्लिमांनी असा सगळ्यांनी हा सण साजरा केला. पण काही अशाही व्यक्ती आहेत, त्यांना दररोज कुटुंबाला भेटणे अशक्य आहे. अशा ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्याना (कैदी) रक्षाबंधन साजरा करावासा वाटतो. पण ते काही शक्य नाही. त्यामुळेच की काय काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून या कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. बहिणीची आठवण काढत हा दिवस कसा जाईल याची चिंता करणाऱ्या कैद्यांच्या जीवनात त्याने काही क्षण का होईना आनंद झिरपला एवढे मात्र नक्की!

ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये कच्चे आणि पक्के असे 3 हजार 500 कैदी आहेत. कारागृह प्रशासन विविध उपक्रम राबवून कैद्यांना माणसात आणण्याचे काम करत असते. या कारागृहात कैदी असलेल्या अनेकांनी दूरस्थ विद्यापीठातून पदव्या घेतल्या आहेत. कारागृहातील कैद्यांनी बनवलेले बेकरी आयटम बाहेर विकले जातात. दिवाळीत कैद्यांकडून बनवलेल्या भेटवस्तू, दिवाळी फराळाची चांगली विक्री होत असते. कारागृहात गांधी साहित्यावर आधारीत अभ्यास शिकवला जातो. त्याच्या परीक्षा होतात. त्यातून अनेक कैदी हिंसेकडून अहिंसेकडे वळलेले आहेत. माणूस हा जन्मताच गुन्हेगार नसतो. त्या त्या काळात आलेल्या परिस्थितीने, संगतीने, वातावरण यामुळे  तो चोरी, खून असे विविध गुन्हे करत असतो. एकुणात परिस्थितीने गुन्हेगार झालेल्या या मंडळींमध्येही एक चांगुलपण असते. त्याला आपण फक्त साद घालणे आवश्यक असते. त्या हेतूनेच कारागृह प्रशासन विविध उपक्रम राबवत असतात.
 हे सुद्धा वाचा
प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडिया’त समावेश होणार का ?, उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत
धनंजय मुंडेंनी साजरा केला रक्षाबंधन, जाणून घ्या बहिणीचे नाव
भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीकडून स्वतःची किडनी भेट

अशा या कैद्यांनाही मन असते. विविध सण आल्यावर त्यांना घरची आठवण येते. यासाठी कारागृह विविध कार्यक्रम राबवत असते. बहीण- भावाचा आवडीचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी अनेकांना बहिणीची आठवण येत असते. काही कैदी या दिवशी भावनिक होतात. अनेकांच्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहते. ही नाजूक भावनिक बाब ओळखून ठाणे कारागृहात काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून या कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात येतो. त्यानुसार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचे निमित्त साधून ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी असलेल्यांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम प्रशासनाकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक कैद्यांना प्रजापती ब्रम्हकुमारी संस्था, लायन्स क्लब ऑफ लोअर परळमध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी राख्या बांधून औक्षण केले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षल अहिरराव यांनी ‘लय भारी’ शी बोलताना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी