29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमुंबईहार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

टीम लय भारी

मुंबई : हार्बर मार्गावर लोकल सेवा (Iocal service) विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे चित्र हार्बर लाईनवरील सर्व स्थानकांवर सकाळपासूनच दिसून येत आहे. गोवंडी येथे रुळाला तडे गेल्याने वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आल्यामुळे सुरळीत लोकलसेवेला आज फटका बसला. दरम्यान सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी रुळाची दुरुस्ती करून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असली तरीही अजूनही लोकल वाहतूक मंद गतीनेच सुरू आहे त्यामुळे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

लोकलच्या या विस्कळीत सेवेमुळे आज हार्बरच्या (harbor route) सगळ्यात ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. हार्बर मार्गावरून मुख्यतः पनवेल आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सोडण्यात येतात परंतु गोवंडी येथे रेल्वेला तडे गेल्यामळे काही काळ ही वाहतुक आज थांबवण्यात आली, त्यामुळे लोकलच्या इतर फेऱ्या सुद्धा विस्कळीत झाल्या. दरम्यान या रुळाचे काम करून वाहतुक पूर्वपदावर आणली असली तरीही वाहतूक पुर्णपणे सुरळीत झालेली नाही, त्यामुळे स्थानकांवरच प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान लोकलसेवेवर परिणाम झाल्यामुळे अनेकांनी आज बेस्टकडे आपला मोर्चा वळवला आहे.

दरम्यान सीएसएमटी (CSMT) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात काल हार्बर मार्गावरील लोकलचा छोटासा अपघात घडला होता, त्यामुळे सुद्धा काल हार्बर लाईनवरील वाहतूक काही वेळ मंदावली होती. काल सीएसएमटीला सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी होती. ग्रीन सिग्नल दिसला तशी लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. सुदैवाने यात कोणालाच दुखापत झाली नाही, परंतु या अपघातामुळे हार्बर मार्गावरील लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा…

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात ‘पक्षप्रमुख’ म्हणणे टाळले

‘उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील’, ठाकरेंची शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर टीका

VIDEO : शिंदे-भाजप सरकारने घेतलेले निर्णय राजकीय फायद्यासाठी?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!