28.7 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमुंबईमहाशिवरात्रीनिमित्त देशभरात होणार बम-बम भोलेचा गजर..!

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात होणार बम-बम भोलेचा गजर..!

महाशिवरात्री उत्सव हा जणू भक्तांसाठी पर्वणीच असतो. उद्या, शनिवार दि. १८ रोजी महाशिवरात्री असल्याने सर्वच शिवमंदिरांमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मंदिर आणि परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप व सजावट करण्यात आले असल्यामुळे यंदा भक्तांमध्ये अतिशय उत्साही वातावरणात आहे. गेल्या दोन वर्षापासून महाशिवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने कपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर यांच्यासह शहरातील सर्वच शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊन संपूर्ण देशभरात बम-बम भोलेचा गजर होऊन शिवभक्त तल्लीन होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये काही मंदिरांना 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देखील देण्यात आली त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (Mahashivratri 2023)

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात होणार बम-बम भोलेचा गजर..!
छायाचित्र सौजन्न- गुगल : कपालेश्वर मंदिर (पंचवटी, नाशिक)

संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिक मधील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कपालेश्वर मंदिर रात्री 12 पर्यंत खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे आहे. त्याचप्रमाणे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने मोठी यात्रा भरते. त्यामुळे १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह इतर ठिकाणची जड वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात होणार बम-बम भोलेचा गजर..!
छायाचित्र सौजन्न- गुगल: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर

वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी १० वाजेपासून २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत औरंगाबाद-दौलताबादमार्गे वेरूळ-कन्नडकडे जाणारी जड वाहतूक ही दौलताबाद टी-पॉइंट (शरणापूर फाटा) येथून कसाबखेडा-वेरूळमार्गे कन्नडकडे जाईल. वेरूळ-खुलताबाद-दौलताबादमार्गे औरंगाबादकडे येणारी जड वाहतूक वेरूळ-कसाबखेडा-दौलताबाद टी-पॉइंटमार्गे औरंगाबादेत येईल. फुलंब्री-खुलताबाद-वेरूळमार्गे जाणारी जड वाहतूक फुलंब्री-औरंगाबाद-नगरनाका-दौलताबाद टी-पॉइंट-कसाबखेडा-वेरूळमार्गे कन्नडकडे जाईल. वेरूळ-खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील जड वाहतूक वेरूळ-कसाबखेडा-दौलताबाद टी-पॉइंटमार्गे औरंगाबादकडे जाईल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे गोदापात्रातील सिद्ध पाताळेश्वर महादेव, त्यागेश्वर, कर्पूरेश्वर, काशी विश्वेश्वर, बाणेश्वर, नारोशंकर, तारकेश्वर आदी मंदिरांची स्वच्छता करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत जनार्दन स्वामी आश्रमातील शर्वायेश्वर महादेव मंदिरातही महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू आहे. याबरोबरच नांदूर घाटावरील नीलकंठेश्वर, रुद्र फार्मजवळील महामृत्युंजय, मानूर येथील शिवगंगा, जुना आडगाव नाका येथील महादेव मंदिर, क्षीरसागर कॉलनी, हिरावाडी रोड येथील बेलेश्वर, औरंगाबाद नाका येथील मनकामेश्वर, मानेनगर येथील ओमकारेश्वर यांसह आडगाव, म्हसरूळ, हनुमानवाडी, मखमलाबाद परिसरातील महादेव मंदिरांतही जय्यत तयारी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  यंदा आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर; प्रथमच होणार ‘दिवाण-ए-आम’ मध्ये शिवजयंती उत्सव

‘माता रमाई जयंती उत्सव’ शासकीय पातळीवर साजरा करा; सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरली आंगणेवाडीच्या भराडी देवीची ओटी; जनतेला सुखी ठेवण्याचे घातले साकडे

भविकांमध्ये उत्साही वातावरण 
या दिवशी भाविक शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची मनोभावे पूजा करून शिवपिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्राभिषेक करतात. महाशिवरात्रीसाथी बऱ्याच ठिकाणी मंदिर परिसर मोकळा करण्यात येणार आहे. या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे एकंदरीत भविकांमध्ये उत्साही वातावरण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी