20 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरमुंबईमहापुरूषांची वारंवार बदनामी, महिलांबाबत सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडी काढणार मुंबईत विराट...

महापुरूषांची वारंवार बदनामी, महिलांबाबत सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडी काढणार मुंबईत विराट मोर्चा

17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सकाळी 11.30 वाजता जिजामाता उद्यानापासून सुरू होणार असून आझाद मैदानात या मोर्चाचा समारोप होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार बेताल वक्तव्ये होत आहेत. तसेच राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील वारंवार महाराष्ट्रातील महापुरूषांची बदनामी करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यपाल कोश्यारी, सत्ताधारी नेत्यांची बेताल वक्तव्ये करणारे नेते, कर्नाटक सीमावाद, राज्यातील अनेक उद्योग धंदे गुजरातला जाणे, तसेच राज्यातील बेरोजगार युवकांच्या प्रश्नांसदर्भात 17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सकाळी 11.30 वाजता जिजामाता उद्यानापासून सुरू होणार असून आझाद मैदानात या मोर्चाचा समारोप होणार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महापुरूषांचा वारंवार अपमान सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. त्याही उपर राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल आक्षेपार्ह विधान केले. तसेच पुण्यात देखील एका कार्यक्रमात त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांद्दल आणि राज्यपालांबद्दल राज्यात प्रचंड असंतोषाची भावना आहे. राज्यपालांना हटविण्याची मागणी देखील होत आहे, तरी देखील राज्यपालांच्या वक्तव्यावर पांघरुन घालण्याचे काम सत्ताधारी भाजप नेत्यांकडून होत आहे.

तर कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावर देखील राज्यसरकार दबकून आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार महाराष्ट्राला दर्पोक्ती दाखवत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात येऊ नये असे सांगत आहेत. महाराष्ट्रातील गावांवर अधिकार सांगत आहेत, असे असताना शिंदे-फडणवीस सरकार मात्र मुग गिळून बसले आहे. जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकार आपला अधिकार सांगत आहे, बेळगावमध्ये राज्यातील नेत्यांनी येऊ नये अशी भाषा कर्नाटकचे मुख्यंत्री करत आहेत. त्यावर भाजप आणि शिंदे गटातील आमदार केवळ फुसकी विधाने करुन केंद्रातील सत्ताधाऱ्यांची मर्जी राखत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा
PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.
महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी; प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन उद्धव ठाकरे देवगिरी बंगल्याकडे रवाना
बिल्डरांच्या फायद्यासाठी कुर्ला रेल्वे स्टेशनला मेट्रो जोडण्याची खोटी माहिती; एमएमआरडीएची बनवाबनवी आरटीआयमधून उघड!
गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, मंत्रीतर अत्यंत बेताल वक्तव्ये करत आहेत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबबत अत्यंत बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्याविरोधात आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गेली. तसेच वारंवार महाविकास आघाडीतील नेत्यांबजद्दल वारंवार जाणीवपूर्वक अशी बेताल वक्तव्ये केली जात आहेत. राज्यातील अनेक उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. मोठमोठे उद्योग कटकारस्थान करुन गुजरातला नेले जात आहेत. मात्र शिंदे फडणवीस सरकार त्यावर गप्प आहे. नोकऱ्यांच्या बाबत राज्यातील तरुणांची फसवणूक सरकार करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या सर्वमुद्द्यांवर सरकारविरोधात येत्या 17 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!