25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमुंबईमेल ट्रेनचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडून मुंबईला येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल...

मेल ट्रेनचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडून मुंबईला येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा उशिराने

मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्टेशन जवळ मेल ट्रेनचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडून मुंबई दिशेकडे येणारी वाहतूक विस्कळित झाली. ही घटना आज सकाळी 7.30 वाजता घडली. एक तासाने बिघाड दुरुस्त करण्यात आला. दरम्यान या काळात कसाराकडून मुंबई दिशेकडे येणारी वाहतूक विस्कळित झाली. आधीच जोरदार पाऊस त्यात हा बिघाड झाल्याने मुंबईला कामानिमित्त येणाऱ्या प्रवासाचे चंगलेच हाल झाले.

या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने होत आहे. दरम्यान लोकल फक्त आटगावपर्यंतच चालवण्यात येत आहेत. ही घटना सकाळी 7.30 वाजता घडली असली तरी लोकलसह अन्य गाड्यांची वाहकुक उशिराने होत आहे.

हे सुध्दा वाचा:

…10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली; जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

भूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन तो़डल्यावर ठाणे जिल्हा प्रशासनाला जाग; कांदळवनासाठी टोल फ्री क्रमांक

विधान सभेत शरद पवार गटातील फक्त 8 आमदार दिसले, व्हीप नेमका कुणाचा मानायचा? आमदारांना प्रश्न

दरम्यान, ठाणे, मुंबईत सोमवार रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा उशिराने सुरू असल्याचे समजते. रेल्वे रुळावर पाणी साचू नये यासाठी सकाळपासून रेल्वे कर्मचारी साफ सफाईचे काम करत असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी