31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमुंबईमुंबईत मोठी दुर्घटना; विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू

मुंबईत मोठी दुर्घटना; विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू

मुंबईतील पूर्व उपनगरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळी परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या इमारतीत ही दुर्घटना घडली ती इमारत म्हाडाची आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी पूर्व परिसरात म्हाडाच्या 40 क्रमांक इमारतीचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोन्ही जखमी व्यक्तींचा क्तीं मृत्यू झाल्याचं न्यूज एजन्सी एएनआयने म्हटलं आहे.

मुंबईतील पूर्व उपनगरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळी परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत (Major accident) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या इमारतीत ही दुर्घटना (Major accident) घडली ती इमारत म्हाडाची आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी पूर्व परिसरात म्हाडाच्या 40 क्रमांक इमारतीचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोन्ही जखमी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.(Major accident in Mumbai; Of the MHADA building in Vikhroli
Slab collapses, two dead)

म्हाडाने दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक आणि तत्काळ रिकाम्या करण्याची गरज असलेल्या 20 निवासी इमारतींची यादी जाहीर केली होती. या 20 इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी इमारती रिकाम्या कराव्यात, असे आवाहन म्हाडाने केले होतं. अशातच विक्रोळीत घरातील स्लॅब कोसळून यात 2 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे.

विक्रोळीत घराचा स्लॅब कोसळला
आज गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास विक्रोळी येथील म्हाडाच्या 40 क्रमांक इमारतीमध्ये घरातील स्लॅब कोसळून यात दोन रहिवाशी गंभीर जखमी झाले. सूर्यकांत म्हादलकर, शरद म्हसाळ अशी जखमींची नवे असून या दोघांना जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असता उपचारा दरम्यान दोघांचा आता मृत्यू झाला आहे.

बीएमसीकडून धोकादायक इमारती जाहीर
मुंबई महानगरपालिकेने शहरातील एकूण 188 धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. तेथील रहिवाशांना तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. शहरात एकूण 10 हजारांहून अधिक मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मात्र, यात दुरुस्ती योग्य इमारतींच्या संख्येचाही समावेश आहे.

मान्सूनपूर्व ऑडिट म्हणजे काय?
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हाडाकडून इमारतींचे मान्सूनपूर्व ऑडिट केले जाते. त्या निकालाच्या आधारे या ‘धोकादायक’ इमारतींमधील रहिवाशांना रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. या रहिवाशांना बांधलेल्या पर्यारी सदनिकांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, अनेक रहिवासी जागेची पसंती आणि इतर सामाजिक कारणांमुळे घरे रिकामी करण्यास नकार देतात. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचेही समोर आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी