मुंबईत आगीच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. डोंबिवली आणि धारावीतील आगीच्या घटना ताज्या असताना आता मुंबईतील गोवालिया टँक, ताडदेव इथं शुक्रवारी (31 मे) रात्री 9:00 वाजेच्या सुमारास आग ( fire) लागली. औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामाला भीषण आग (fire) लागल्यानं कामगारांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीमध्ये मोठी वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी आग ( fire) लागली आहे त्या ठिकाणी कुणी कामगार किंवा इतर व्यक्ती आहे की नाहयाबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. (Massive fire breaks out in Mumbai’s Taddeo area)
गोदामाला लागलेली आग नेमकी कशामुळे लागलेली आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरचे काही व्हिडिओज समोर आले आहेत हे व्हिडिओ पाहिले असता आगीची तीव्रता लक्षात येते. गोदामात असलेल्या साहित्यामुळे आग झपाट्याने पसरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत कुणीही जखमी किंवा कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच घटनास्थळी कुणी कर्मचारी किंवा नागरिक अडकलेले तर नाहीये ना हे सुद्धा तपासण्यात येत आहे. ताडदेव परिसरात ज्या ठिकाणी ही आग लागली त्या गोडाऊनमध्ये प्लास्टिकचे सामान आहे आणि त्यामुळेच आग झपाट्याने पसरली असल्याचं बोललं जात आहे.
जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठी :
मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेवमधील पठ्ठे बापूराव मार्ग, 249, तालमिकीवाडी इथं शुक्रवारी रात्री एकमजली इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली. प्लास्टिकच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्लास्टिकला आग लागल्यामुळं आगीचा भडका अधिक मोठा झाला. त्यामुळं हवेत आगीचे मोठ-मोठे लोळ दिसत होते. तसंच परिसरात धुरांचे लोटही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं परिसरात अंधार पसरला. दरम्यान, सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.