31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईलोकांनी तक्रार केली म्हणून गझनीने सोमनाथ मंदिर तोडले

लोकांनी तक्रार केली म्हणून गझनीने सोमनाथ मंदिर तोडले

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एकदा स्फोटक विधान करून वादाची ठिणगी पेटवली आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिर (Somanath Temple) तोडून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नाही. या मंदिराबाबत लोकांनी मोहम्मद गझनीकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या या तक्रारींची दखल घेत मोहम्मद गझनीने सोमनाथचे मंदिर पाडले, असे वादग्रस्त वक्तव्य मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी केले आहे. (Ghazni destroyed the Somnath Temple only to prevent the malpractices in the temple)

‘एनएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सोमनाथ मंदिराबाबत ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मोहम्मद गझनीने सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला, असे लोक म्हणतात. पण त्यांना यामागचे कारण माहित नाही. तेथील लोकांनी याबाबत मोहम्मद गझनीकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. मंदिरात आस्थेच्या देवी-देवतांच्या नावावर गैरप्रकार सुरु आहेत. मंदिरातून कशाप्रकारे मुलींना गायब केले जात आहे. लोकांनी केलेल्या या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी गझनीने आपले हेर मंदिरात पाठविले होते. त्यानंतरच मोहम्मद गझनीने सोमनाथचे हे मंदिर पाडले.”

हे सुद्धा वाचा 

‘गोडसे’ला सुद्धा ‘ब्लॉक’ करणार का?

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!

गझनीने सोमनाथ मंदिर पाडून चूक केली नाही
मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी जे ऐतिहासिक दावे केले आहेत. त्याला कोणताही संदर्भ दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण होऊ शकतो. मोहम्मद गझनीने सोमनाथ मंदिराचा विध्वंस करून कोणतीही चूक केली नसल्याचे मौलानांनी म्हंटले आहे. ते म्हणाले, “मोहंम्मद गझनीने मंदिर तोडून कोणतीही चूक केली नाही. मंदिरातील गैरप्रकारांना रोखण्यासाठीच त्याने हे मंदिर पाडले.”

२६३ किलो सोने, साडे सहा हजार किलो चांदी, १७०० कोटींच्या ठेवी…
ही आहे केरळच्या गुरुवायूर देवस्थानची संपत्ती
दरम्यान, केरळमधील प्रसिद्ध गुरुवायुर श्रीकृष्ण मंदिर प्रशासनाने आपल्याकडे तब्बल २६३.६३ किलो सोने, ६६०५ किलो चांदी आणि १७०० कोटी रुपयांच्या बँक ठेवी असल्याचे घोषित केले आहे. तसेच देवस्थानच्या मालकीची २७१ एकर जागा असल्याचे जाहीर केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देवस्थानाकडे असलेल्या सोन्याचा तपशील देण्यास मंदिर प्रशासनाने आधी नकार दिला होता. पण आता माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती उजेडात आली आहे. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात हे प्राचीन मंदिर आहे. १४ व्या शतकात हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मात्र, या मंदिराच्या अलीकडच्या काळातील नोंदी १७ व्या शतकात सापडतात.

 लोकांनी तक्रार केली म्हणून गझनीने सोमनाथ मंदिर तोडले

देवस्थानचा भोंगळ कारभार
गुरुवायुर देवस्थानाच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. देवस्थानच्या विकासासाठी तसेच भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंदिर प्रशासनाकडून गांभीर्याने प्रयत्न केले जात नव्हते, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते एम. के. हरिदास यांनी केला आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीतून देवस्थानकडील सोन्याचा तपशील उघड झाला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी