कोकणच्या पर्यटनाला (Tourism) चालना मिळून येथील अर्थकारणालाही गती मिळणार आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दोन या जिल्ह्यांना जोडणाऱ्या २१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे कोकणात (Konkan) येणाऱ्या हजारो पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. तसेच साखर कारखानदारांच्या वाहतुकीचा वेळ कमी होणार असून येथील अर्थकारणही गतिमान होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नानांना यश आले असून या कामासाठी केंद्र सरकारकडून २४९.१३ कोटी रुपयांच्या निधीस मजुरी देण्यात आली आहे. (Minister Ravindra Chavan’s booster for Konkan tourism)
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे, गगनबावडा म्हणजेच करूळ घाटापासून ते गगनबावडा येथपर्यंतचा १६.५० कि.मी. लांबीचा रस्ता आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण आणि दुपदरीकरणाचे काम लावकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत (Ministry of Road Transport And Highway’s) २४९.१३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिल्लीत ‘स्टँडीग फायनान्स समिती’ची (Standing Finance committee) बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला”.
हे सुद्धा वाचा
पालकांनो, मुलांना “ही” दोन कफ सिरप दिली तर, अनर्थ घडेल!
धनूभाऊंच्या भेटीला पंकजाताई ब्रिच कॅन्डी रुग्णालयात; आस्थेने केली तब्बेतीची विचारपूस
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा मुख्य महामार्ग आहे. पर्यटक आणि साखर कारखानदार यांची या महामार्गावर सतत ये-जा सुरु असते. त्यामुळे पर्यटन आणि कारखानदारीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. करूळ घाटात ४ हजार ते ५ हजार मिमी इतका तुफान पाऊस पडतो. त्यामुळे येथील डांबरी रस्त्यांची वाताहत झाली होती. त्यामुळे पर्यटकांना प्रवासादरम्यान प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत होता. तसेच येथील वाहतूकही मंदावली होती, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या घाटरस्त्यावर १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या रस्त्याची रुंदीदेखील वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाहांचा या रस्त्यावरील प्रवास सुखकर होण्यास मदत होईल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
यांसदर्भात बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळावी यासाठी आमच्या विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. तसेच केंद्रीय रस्ते वाहतून मंत्रालयाशी वेळोवेळी आवश्यक तो पत्र व्यवहार करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले.