27 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमुंबईखळबळजनक : मद्य व्यावसायिकांच्या ‘लक्षवेधी’ झाल्या गायब, आमदारांनी अधिकाऱ्याच्या निलंबनाची केली मागणी

खळबळजनक : मद्य व्यावसायिकांच्या ‘लक्षवेधी’ झाल्या गायब, आमदारांनी अधिकाऱ्याच्या निलंबनाची केली मागणी

टीम लय भारी

मुंबई : सरकारच्या कारभारातील त्रुटी, गैरप्रकार, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडायची असेल तर विधीमंडळाची सभागृहे ही आमदारांसाठी हक्काचे व्यासपीठ असते. एखाद्या संवेदनशील विषयावर सभागृहात प्रश्न येऊ घातला तर त्यावर संभाव्य दोषी व्यक्तींना घाम फुटतो. पण अशा संभाव्य दोषींवर बालंट येऊ नये म्हणून त्यांच्या विरोधातील ‘लक्षवेधी’च गायब केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या लक्षवेधी गायब करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात यावे असे लेखी पत्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.

पटोले यांचे खासगी सचिव शांताराम भोई यांनीच प्रश्न गायब केल्याचा आरोप पटेल यांनी या पत्रात केला आहे. एवढेच नाही तर, भोई यांना निलंबित करण्याचीही मागणी पटेल यांनी पटोले यांच्याकडे केली आहे. पटेल यांच्या या पत्रावर आता पटोले यांनी चौकशी सुरू केल्याचे समजते. भोई व अन्य अधिकारी – कर्मचाऱ्यांना बोलावून प्रश्न गायब झाल्याबद्दल पटोले यांनी सुद्धा खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

आमदार राजकुमार पटेल यांनी एकूण 21 लक्षवेधी सभागृहात उपस्थित करण्यासाठी सादर केल्या होत्या. पण त्यातील 8 लक्षवेधी गायब झाल्या. या लक्षवेधी गायब का झाल्या याची चौकशी करण्याचे मागणीपत्र पटेल यांनी दिले. त्यासाठी त्यांनी ‘लक्षवेधी’ हाताळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांपासून ते लिपिकापर्यंत पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांच्या 5 लक्षवेधी स्वीकृत करण्यात आल्या. पण अन्य तीन लक्षवेधी स्वीकृत झाल्याच नाहीत.

या तीन लक्षवेधी मुंबईतील मद्य व्यावसायिकांशी संबंधित होत्या. लक्षवेधी स्विकारण्याच्या कालावधीत या मद्य व्यावसायाशी संबंधित काही खासगी लोक विधानभवनात येऊन गेले आहेत. हे खासगी लोक विधानभवनात येऊन गेल्यानंतरच ‘लक्षवेधी’ गायब झाल्याचा आमदार पटेल यांचा आक्षेप आहे. या लक्षवेधी गायब होण्यास शांताराम भोई हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करावे अशी पटेल यांनी मागणी केली असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले. नाना पटोले यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून त्याबाबतची चौकशी करण्याच्या सुचना त्यांनी केल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

एका अधिकाऱ्याचे मनोगत

मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बिनकामाचे अधिकारी, नगरविकास विभाग मंत्री कार्यालयावर नाराज

मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात नवे खासगी सचिव

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!