27 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरे गटातील आमदाराचा सोनू निगमवर हल्ला

उद्धव ठाकरे गटातील आमदाराचा सोनू निगमवर हल्ला

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगम याला सोमवारी चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ११.०० च्या सुमारास हा प्रकार घडला. चेंबूर येथे उद्धव ठाकरे गटातील स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी एका संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. यावेळी फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नीलने सेल्फी काढण्याच्या नादात सोनू निगमचा मित्र आणि त्याच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की केली. सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. स्थानिक आमदाराने यावेळी सोनूची व्यवस्थापक सायरा हिच्यासोबतही गैरवर्तन केले. याप्रकरणी स्वप्नील फातर्पेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपयुक्त हेमराज सिंग राजपूत यांनी दिली. (MLA from Uddhav Thackeray group attacked Sonu Nigam)

MLA from Uddhav Thackeray group attacked Sonu Nigam

स्वप्नील फातर्पेकर याला सोनूसोबत सेल्फी काढायचा होता. परंतु सोनूच्या टीमने त्याला मनाई केल्यानंतर त्याचे कार्यकर्ते संतापले. सोनू व्यासपीठावरून खाली उतरत असताना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी सोनूला पायऱ्यांवरून खाली ढकलले. सुदैवाने यावेळी सोनूला गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी स्वप्नील फातर्पेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेदरम्यान सोनूचा अंगरक्षक त्याचा या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्वरित पुढे सरसावला. सोनू निगमला वाचविताना झालेल्या धक्काबुक्कीदरम्यान हा अंगरक्षक व्यासपीठालगत असलेल्या पायऱ्यांवरून खाली पडला. त्यांनंतर सोनूचा मित्र रब्बानी खान याने हल्लेखोर कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोराने रब्बानी याला जोराचा धक्का दिल्यामुळे तो पायऱ्यांवरून सात फूट खाली जमिनीवर कोसळला. सुदैवाने या धक्काबुक्कीत सोनू निगमला गंभीर दुखापत झाली नाही. पण त्याचा अंगरक्षक आणि मित्र हे दोघेजण या घटनेदरम्यान जखमी झाले आहेत.

रब्बानी हा सोनू निगमचे गुरु उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा आहे. २०२१ मध्ये उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन झाले. सोनुने त्याचा अंगरक्षक आणि मित्र रब्बानी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

हे सुद्धा वाचा

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

राज्यातील 1 हजारांहून अधिक शाळांमध्ये होतेय डिजिटल लायब्ररीची अंमलबजावणी – कैलास पगारे

आताच जागे व्हा, अन्यथा २०२४ नंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होईल !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी