29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईGaneshotsav 2022, : 'कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस...

Ganeshotsav 2022, : ‘कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…’

राज्यात सध्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा गणेशोत्सवात प्रत्येकच जण आपापल्या परीने मोठा उत्सव साजरा करीत आहे. या दिवसांत गणोशोत्सव आणि राडा असे समीकरण सुद्धा बऱ्याचदा पाहायला मिळते आणि तसेच काहीसे मुंबईत घडले आहे. गणपतीचा मंडप उभारण्यावरून वाद झाला आणि या वादात एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ही मारहाण मनसे कार्यकर्त्यांनी केली असून याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करीत लोक त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. खरंतर गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी एका मनसे कार्यकर्ता पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू लावत होता. यावर सदर महिलेने विरोध दर्शवला, याचा राग आल्याने त्या कार्यकर्त्यांनी आणखी दोघांना सोबत घेत त्या महिलेला धक्काबुक्की केली. या घटनेचा सदर व्हिडिओच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेचा जबाब नोंदवून तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. विनोद अरगिळे, राजू अरगिळे, संदीप लाड असे अटक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांची नावे आहेत.

यावर पत्रकार वैभव परब यांनी तीव्र संताप व्यक्त करत सोशल मीडियावर मत व्यक्त केले आहे. ट्विटमध्ये परब लिहितात, धिक्कार असो…. धिक्कार असो… कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता….. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो कारवाई झालीच पाहिजे… असे म्हणून वैभव परब यांनी कारवाईची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा…

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज पुण्यात!

Uddhav Thackeray : शहाजी पाटलांचा कार्यक्रम ‘ओके’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडला चुकीचा माणूस !

या संपुर्ण प्रकरणावर बोलताना त्या पीडित महिलेला मारहाण करणारे विनोद अरगिळे म्हणतात, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिनं अर्वाच भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यानं सांगितलं. महिलेनं आमच्या अंगावर येऊन आमची कॉलर धरणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं. तिनं आमच्या अंगावर धावून आली म्हणजे, आम्ही आमच्या बचावासाठी काहीच करायचं नाही का? आम्ही महिलांचा आदर करणं गरजेचं आहेच. पण त्यांनीही आमचा आदर राखणं गरजेचं आहे असे म्हणून अरगिळे यांनी त्या महिलेवर आरोप केला आहे.

पुढे अरगिळे म्हणाले, त्या राज ठाकरे यांच्याबद्दल उलटसुलट बोलत होत्या. त्या माझ्या अंगावर आल्या, त्यामुळं माझ्याकडून हे कृत्य घडलं. त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागायला तयार आहे. माझ्यावर जी कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे असे  म्हणून त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणावर मुंबई पोलीस काय कारवाई करणार आणि मनसे अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी