33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमुंबई२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमूर्ती, राजकारणी, उदयगपतींवर 'पेगासस'ची हेरगिरी

२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमूर्ती, राजकारणी, उदयगपतींवर ‘पेगासस’ची हेरगिरी

देशात निवडणुका हा केवळ एक सोपस्कार उरला असून आजही देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख राजकारणी आणि उद्योगपतींवर इस्रायलमधील कुख्यात डिटेक्टिव्ह कंपनी ‘पेगासस’मार्फत हेरगिरी करण्यात येत आहे. या कंपनीस देशातीलच काही उद्योगपती अर्थपुरवठा करत आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मधुर संबंधांवर राऊत यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश टाकला आहे. (Modi’s resignation in mid-2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval will be exposed soon) यांचे आणखी एक भयंकर प्रकरण वॉशिंग्टनमधून लवकरच उघड होणार असून त्यांना वेळीच रोखले नाही, तर मोदी यांच्यावर २०२३ च्या मध्यावर राजीनामा देण्याची वेळ येईल, असा दावा भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून संजय राऊत यांनी खळबळजनक दावे केले आहेत.

Modi's resignation in mid-2023

देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ‘पेगासस’ (Pegasus is a spyware developed by NSO Group, an Israeli surveillance firm) कोणत्याही थराला जाऊ शकते. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेतही ही कंपनी घोटाळे करत आहे. समाजमाध्यमांवरून जातीय तेढ, धर्मांधतेचे विष कालवण्याचे काम ‘पेगासस’ करत आहे. देशातील मोठ्या वर्गाला संमोहित करून मोदी सांगतील त्यावर माना डोलवाव्यात, यासाठी ही कंपनी मानसशात्रीयदृष्ट्या डावपेच आखत आहे, हे परखड सत्य ‘द गार्डियन’ ने उघडकीस आणल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

आता आपल्या देशातील अंधभक्त सांगतील, ‘द गार्डियन’ने मांडलेले हे सत्य म्हणजे देशावरील हल्ला आहे. प्रश्न इतकाच आहे की, भारतात या कंपनीच्या ‘सेवा’ कोणता राजकीय पक्ष घेत आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. इस्रायलच्या या कुख्यात ‘पेगासस’ने ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये छेडछाड (हॅक) करून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचे रूपांतर विजयात केले. मोदींची लोकप्रियता व त्यांना २०१४ पासून मिळणारे विजय ही ‘पेगासस’ची आणि बोगस ट्विटर अकाऊंटची देणगी आहे काय?, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

मोदीजी, प्रश्नांपासून तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत… अदानी, महागाई, बेरोजगारी यांसारख्या अनेक मुद्द्यांवर देश तुम्हाला आज प्रश्न विचारत आहे… पण तुम्ही या प्रश्नांनी भयभीत झालेले, बिथरलेले हुकूमशहा आहात… मला तुमची कीव येत आहे.. मोदी यांचे ६० % ट्विटर फॉलोअर्स हे बनावट आहेत आणि १८ हजार ट्विटर अकाउंट भाजपसाठी ‘फेक न्यूज’चा प्रसार करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांनी केला आहे. 

  • देशात ‘बीबीसी’वर धाडी पडल्या. महाराष्ट्रातील उद्योगपतींवर धाडींवर धाडी पडत आहेत, पण खळबळ उडवून देण्याऱ्या अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समिती नेमून चौकशी करायला मोदींचे सरकार तयार नाही.
  • कोट्यवधींच्या काळ्या पैशांच्या राशी उद्योगपती, व्यापाऱ्यांकडून गोळा केल्या व कोरोना काळात ‘पीएम केअर फंडा’त गुंतवल्या. पंतप्रधानांच्या नावे सुरु असलेला हा फंड शेवटी ‘फ्रॉड’ निघाला, पण एकही केंद्रीय तपास यंत्रणा या पैशांचा हिशेब मागायला तयार नाही.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना आमदाराचा इशारा…

Video : निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

टी. एन. शेषन : निवडणूक आयोगाला बळकट करणारा वाघ !

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी