32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईMohit Kamboj : विद्या चव्हाणांनी माझी बदनामी केली, मोहित कंभोज यांचा आरोप

Mohit Kamboj : विद्या चव्हाणांनी माझी बदनामी केली, मोहित कंभोज यांचा आरोप

विद्या चव्हाण यांनी दोन चॅनलला नुकतीच मुलाखत दिल्या त्यावेळी बोलताना मोहित कंभोज यांचा त्यांनी समाचार घेतला. यावर आक्षेप घेत कंभोज यांनी विद्या चव्हाणांविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांताक्रुझ पोलिसांनी सुद्धा तक्रार नोंदवून घेत भारतीय दंड संहितेनुसार कलम 505 (2), 37 (1), 135 आणि 500 या कलमांतर्गत विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर घोटाळेबाजांची नावे काढण्यासाठी मशहूर असलेले भाजप नेते मोहित कंभोज सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. दरवेळी सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमातून विरोधी गटातील नेत्यांवर टीका करणारे कंभोज नेहमीच अॅक्शन मोडमध्ये दिसून येतात. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी बदनामी केल्याचा आरोप करत थेट पोलिस ठाणे गाठले आहे. दोन गटांमध्ये शत्रूत्व, द्वेष निर्माण होईल असे आवेशपूर्ण वक्तव्य मीडियावर करून सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे वक्तव्य करून माझी बदनामी सुद्धा केली, असे कंभोज यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर विद्या चव्हाणांकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्या चव्हाण यांनी दोन चॅनलला नुकतीच मुलाखत दिल्या त्यावेळी बोलताना मोहित कंभोज यांचा त्यांनी समाचार घेतला. यावर आक्षेप घेत कंभोज यांनी विद्या चव्हाणांविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांताक्रुझ पोलिसांनी सुद्धा तक्रार नोंदवून घेत भारतीय दंड संहितेनुसार कलम 505 (2), 37 (1), 135 आणि 500 या कलमांतर्गत विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंभोज यांच्या तक्रारीनंतर विद्या चव्हाण नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, परंतु गुन्हा दाखल झाल्यामुळे विद्या चव्हाण यांना लवकरच पोलीस चौकशीला सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केले पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

Sharad Pawar : मोदींच्या ‘अच्छे दिन’वरून शरद पवार झाले आक्रमक

Sharad Pawar : ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज, शरद पवारांचा सूचक इशारा

मोहित कंभोज यांनी दिलेल्या तक्रारीत विद्या चव्हाण यांनी एबीपी माझा आणि टी व्ही 9 या चॅनलला दिलेल्या मुलाखचीचा संदर्भ दिला आहे. मुलाखतीच्या वेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या की, आता मोहित कंभोज असतील किंवा तुमचा तो किरीट सोमय्या असेल यांना तुम्ही गुजरातमध्ये पाठवून द्या ना. त्यांचं महाराष्ट्रात काहीही काम नाही. त्यांनी गुजरातमध्ये जावे, इथे चौकशा करू नयेत. गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचा व्यापार आहे, लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत, त्यांची चौकशी करावी अशे ठणकावून सांगितले होते आणि याच मुद्याचा संदर्भ त्यांनी एफआरआय मध्ये दिला आहे.

दरम्यान टी व्ही 9 शी बोलताना विद्या चव्हाण यांची जीभ घसरली, त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, मोहित कंबोजला सांगायचे तर औकात में तु रह, जादा अगर किया तो महिलाओंको जो हैं ना, महिला को सन्मान करो. तुम लोग सीतामय्या का सन्मान नही कर रहे तो हम लोग महिलाओंका सन्मान करेंगे. अगर महिलाये तो हमारी इतनी चीड गयी है ऐसे लोगोंको महाराष्ट्र के बाॅर्डर पे छोडके आना चाहिये या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी त्यांच्या तक्रारीत संदर्भ देत बदनामी झाल्याचे म्हटले आहे.

मोहित कंभोज यांच्या तक्रारीनंतर विद्या चव्हाण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखादे विधान केल्यानंतर बदनामी झाली म्हणून गुन्हा दाखल होणार असेल तर भाजपच्या गोटात सुद्धा बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांसाठी वेगळा नियम बनवण्यात आला आहे का असा सवालच यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी