34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईपैसेवाल्या शिवसेनेकडून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

पैसेवाल्या शिवसेनेकडून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

"सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा ह्या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका," अशा शब्दांत आव्हाडांनी विरोधी पक्षाला सुनावलं आहे.

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षाकडून पक्ष तोडण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर दावा केला आहे. आज (शनिवार, 28 जानेवारी) मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास याविषयी ट्विट करत त्यांनी विरोधी पक्षाला धारेवर धरले आहे. (Moneyed ShivSena trying to break the NCP; Allegation of Jitendra Awhad)

आव्हाड यांनी केलेल्या आरोपानुसार, पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्य्रामधील नगरसेवकांना त्रास दिला जातोय. 1 कोटी रुपयाचे आमिष दाखविण्याचे प्रकार सुरु झालेत. नगरसेवकला 10 कोटी रुपयांची कामे आणि तिकीट देतो असे सांगून राष्ट्रवादी फोडण्याचे प्रकार सुरु झालेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याविषयी ट्विट करत त्यांनी माहिती दिली.

त्याचप्रमाणे भाऊ जितू पाटील याला पैशाचे आमिष दाखवून पक्ष प्रवेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे सुद्धा संतापजनक असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता; त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैशेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे 4-4 तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हालकून देईल, असा संताप देखील आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

“सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा ह्या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका,” अशा शब्दांत आव्हाडांनी सुनावलं आहे.

हे सुद्धा वाचा : डॉ. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला सॅल्यूट !

VIDEO : जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर; पण…

‘मार्गारेट आल्वा‘ एनसीपीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा

शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवारांना जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “अनेक ठिकाणी मुख्य पक्ष फोडून अनेकांना दुसरीकडे घेऊन जात आहेत. पण याचा फारसा विचार करायचा नसतो”. लोकप्रतिनिधी फोडण्याची पावलं शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत. पण हे घडत असतं, त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नाही असं ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी