33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमुंबईमुंबईची बेस्ट होणार आता १००% इलेक्ट्रिक: आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबईची बेस्ट होणार आता १००% इलेक्ट्रिक: आदित्य ठाकरेंची घोषणा

टीम लय भारी 

मुंबई: मुंबईतली बेस्ट बस (Mumbai Best bus) आता लवकरच १०० टक्के इलेक्ट्रिक होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली आहे. त्यासोबत डिजिटल कार्डचं अनावरणही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे कार्ड रिचार्ज करता येऊ शकतं. तसंच केवळ शंभर रुपयांत हे कार्ड प्रवाशांना उपलब्ध होणार अशी महिती आदित्य ठाकरेंनी दिली. (Mumbai Best bus to be 100% electric now Aditya Thackeray’s announcementt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यावर धावणार आहेत. सध्या ३३३७ बस उपलब्ध आहेत. १० हजार बसची आणखी गरज आहे. या बस १०० (Mumbai Best bus) टक्के पर्यावरण पूरक असाव्यात, त्यातल्या सगळ्या इलेक्ट्रिक हव्यात. या सर्व बसपैकी निम्म्या बस डबल डेकर असतील अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

गेटवे ऑफ इंडिया ते चर्चगेट मार्गावर स्ट्रेस फ्री व अतिशय उपयुक्त ठरेल अशा ‘टॅप-इन टॅप आऊट’ सेवेचे उद्घाटन झाले असुन, आम्ही काही दिवसांतच या मार्गावरील १० बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करत आहोत. त्यानंतर सर्व ४३८ मार्गांवर ही सेवा उपलब्ध होईल.’पुढे चला’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन अत्याधुनिक सुविधांसह बेस्ट (Mumbai Best bus) आपल्या सेवेचे स्वरूप बदलत आहे. केवळ ५ रुपये पासूनच वाजवी दरात होणारा. प्रवास पर्यावरणस्नेही करण्यासाठी २०२७ पर्यंत पर्यायी इंधनावर धावणाऱ्या बसेसची संख्या १००% करणार आहोत. अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली.

बेस्टला पुढे कसं नेता येईल यावर सतत बोलणं सुरू असतं. कारण बॉम्बहल्ले, पूर, कोविड काळ या सगळ्यात बेस्ट कायम धावत राहिली आहे. बेस्ट खरंच बेस्ट आहे. बेस्टचा (Mumbai Best bus) प्रवास इलेक्ट्रिकपासून सुरू झाला आता आपण पुन्हा इलेक्ट्रिककडे आलोय. डबलडेकर बस हव्यात असा माझा आणि मुख्यमंत्री महोदयांचा कायमच आग्रह राहिलेला आहे. असे आदित्य ठाकरेंनी आपले मत व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा :

Mumbai To Become First City In The Country To Get 100% Digital Buses With Tap In, Tap Out Facility. Details Here

कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका :  दिलीप वळसे पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी