29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईमुंबई महानगरपालिका उभारणार आशियातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प!

मुंबई महानगरपालिका उभारणार आशियातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प!

मुंबई महानगरपालिकेकडून शहराच्या हद्दीत आशियातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या मुंबईत 6 हजार टन घन कचरा गोळा होतो. त्यापैकी 3 हजार 500 टन ओला कचरा आहे. दररोज मुंबईत गोळा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी एक तृतियांश कचऱ्यावर या प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल प्रक्रियेची क्षमता लक्षात घेतली तर हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचा सदुपयोग करण्याच्या कल्पनेतून हा प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महानगर लिमिटेडच्या (एजीएल) सहकार्यातून पालिका हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज 1 हजार टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. बायोगॅस प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करुन कॉम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) तयार केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून प्रस्ताव आल्यानंतर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2022मध्ये केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. सध्या तो आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. त्यात 300 टन धानाच्या कचऱ्यापासून 33 टन गॅस दररोज तयार केला जातो. पूर्व उपनगरातील 3 जागा प्रस्तावित येत्या काही आठवड्यांमध्ये महापालिका आणि एजीएल यांच्यात यासंदर्भात करार होणार आहे. त्या अंतर्गत महापालिका जागा देणार असून खर्चाचा भाग एसजीएल बघणार आहे. पूर्वेकडील उपनगरांमधील तीन जागा या प्रकल्पासाठी सध्या निर्धारित करण्यात आल्या आहेत. करार करण्यापूर्वी नियोजित जागेबाबत निर्णय घेतला जाईल. करार झाल्यानंतर केवळ एका वर्षात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा: 

अजित पवार भाजपसोबत…; शरद पवार स्पष्टचं बोलले

अखेर ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मिटला; मंगलप्रभात लोढा यांनी केली मोठी घोषणा

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: DRDO प्रदीप कुरुलकरांची RAW कडून चौकशी!

Mumbai biogas project: BMC will set up the largest biogas project in Asia in Mumbai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी