मुंबई

Bhai Jagtap : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड?

टिम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नेत्यांनी चांगलीच फिल्डिंग लावून ठेवली होती. त्यात आता भाई जगताप (Bhai Jagtap) यांची वर्णी लागल्याचं चित्र आहे.

मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्लीवारी केली होती.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार असल्याचंही समजतं. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड निश्चित मानली जात आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये पकड घट्ट करण्यात आली आहे.

कोण आहेत भाई जगताप?

– अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख
– भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार
– जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म
– भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव

मराठी विरूद्ध मराठी

विशेष म्हणजे भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची निवड जवळपास निश्चित करुन मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरूद्ध मराठी विरूद्ध मराठी नेते अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको. भाई जगताप यांच्यासह माजी आमदार चरणसिंह सप्रा, माजी मंत्री सुरेश शेट्टीयांची नावं मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

दिल्लीत खलबतं

महाराष्ट्रामधील संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल, आशिष दुवा, महाराष्ट्र प्रभारी सचिव उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये संघटन फेरबदल आणि जिल्ह्याध्यक्ष बदलावर चर्चा झाली. जानेवारीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

15 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

16 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

17 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

19 hours ago