33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईमुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी केली थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक

मुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी केली थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक

टीम लय भारी

मुंबई :-  मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा डेटा अवैध रित्या पायरसीच्या माध्यमातून थोप टीव्ही ॲपवर उपलब्ध होत होता. त्यामुळे संबंधित गुन्हेगाराला मुंबई पोलिसांकडून हैदराबाद इथे अटक करण्यात आली आहे (Mumbai cyber crime police arrest owner of Kelly Thop TV app).

थोप टीव्ही ॲपचा मालक 28 वर्षांचा असून तो एक आयटी अभियांत्रिकी आहे. सतीश वेंकटेशवरलू असे या थोप टीव्हीच्या मालकाचे नाव आहे. नवीन चित्रपट, सिरीज, आणि लाईव्ह स्पोर्ट्स हे अमोझोन प्राईम, नेटफ्लिकस, हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन घेऊन मिळत होते ते थोप टीव्ही ॲपवर वापरकर्त्यांना मोफत पाहायला मिळत होते.

एमपीएससी नियुक्तीसाठी झालेल्या बैठकीचा निर्णय जाहीर, 15500 पदांची होणार भरती

धनंजय मुंडे नावाचा झंझावात…!

त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सतीशला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायदा 200 नुसार कलम 43, 66 आणि 668 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai cyber crime police arrest owner Thop TV app
सायबर क्राईम

अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते; नाना पटोले

Hyderabad engineer who ran Thop TV arrested for pirating OTT content

काय आहे थोप टीव्ही ॲप

थोप टीव्ही हा असा ॲप आहे ज्यावर वापरकर्त्यांना नवीन चित्रपट, नवीन सिरीज आणि लाईव्ह स्पोर्ट्स हे मोफत पाहायला मिळतात. ज्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना पैसे देऊन सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. हा ॲप दोन वर्षांपासून सुरू होता, परंतु आता ॲपच्या मालकाला अटक केल्यामुळे सर्व्हर डाउन दाखवण्यात येत आहे. या ॲपचे लाखो वापरकर्ते आहेत, तर पाच हजार जणांनी पैसे भरून या ॲपची सेवा वापरली असल्याचे समजते.

कोणी केली थोप टीव्ही ॲप विरोधात तक्रार

व्हाया कॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड व इतर ब्रॉडकास्टरसनीं या ॲप विरोधात तक्रार दाखल केली आहे. या ॲपमुळे या ब्रॉडकास्टर्सचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे त्यांनी तक्रार केली. त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा कंटेंट हा लिक केला जात असल्याचे समजते (It is understood that their content is being leaked without their permission).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी