31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईमुंबईकरांची लाडकी डबल डेकर झाली 85 वर्षांची; जाणून घ्या थोडक्यात इतिहास

मुंबईकरांची लाडकी डबल डेकर झाली 85 वर्षांची; जाणून घ्या थोडक्यात इतिहास

मुंबईकरांची लाडकी दुमजली बस गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) 85 वर्षांची होते वर्षांची होत आहे. 8 डिसेंबर 1937 रोजी पहिली दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली.

मुंबईकरांची लाडकी दुमजली बस गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) 85 वर्षांची होते वर्षांची होत आहे. 8 डिसेंबर 1937 रोजी पहिली दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. तेव्हापासून ते आज अखेर डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत आहे. देशभरातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी डबल डेकर बसचे आकर्षण असते. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना एकदातरी या बसमधून प्रवास करण्याची इच्छा असते. मुंबईच्या डबल डेकर बसचे आकर्षण चित्रपटसृष्टीला देखील होते. अनेक हिंदी, मराठी चित्रपटात मुंबई म्हटले की डबल डेकर बस देखील दिसायची. असा या मुंबईच्या डबल डेकर बसचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

इंग्रजांनी समुद्रातील सात बेटे एकत्र करुन मुंबई वसवली. व्यापार, वखारींची सुरक्षितता हा मुख्य उद्देश ठेऊनच मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करायला सुरूवात केली गेली. हळुहळू मंबईत व्यापारी, कामगार, उद्योगधंद्यांची वाढ होऊ लागली तसतशी मुंबईतील लोकसंख्या देखील वाढू लागली. इंग्रजांनी व्यापाराच्या उद्देशाने मुंबई-ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरू केलीच पण नंतरच्या काळात वाढती लोकसंख्यापाहून मुंबईत ट्राम, बस सेवा देखील सुरू झाली. 1905 साली मुंबईत बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कं. लि. (बेस्ट) कंपनी स्थापन झाली. ट्रामसेवेपाठोपाठ मुंबईत 1926 साली बस सेवा देखील सुरू झाली.

१९३७ साली मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन प्रवाशांच्या सोईसाठी पहिल्यांदा बेस्टकडून डबल डेकर बसची वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर 1965 साली अध्ययावत डबल डेकर बसेस मुंबईत दाखल झाल्या. या बसेसमध्ये आधीच्या बसेसच्या प्रवासी वाहतूकीच्या तुलनेत अधिक प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता होती. जवळपास 100 प्रवासी एका बसमधून प्रवास करु शकत होते. 21 शतक उजाडता उजाडता प्रदुषण विरहीत बसेसचा विचार पुढे आला आणि बेस्टने सीएनजी गॅसवर चालणाऱ्या बसेस आणल्या या बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या.

मै तो अन्याय खिलाफ लढा हूँ; रामदास आठवलेंनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद 

आपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे : नाना पटोले

जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!

बेस्ट कंपनी 7 ऑगस्ट 1947 साली मुंबई महापालिकेकडे आली. त्यानंतर खासगी कंपनीचे रुपांतर सार्वजनिक उपक्रमात झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज अखेर बेस्ट बसेसमध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुसार अत्याधूनिक बसेस येत राहिल्या, सुरुवातीला डिझेल इंजिन, सीएनजी आणि आता बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस देखील मुंबईत धावत आहेत. आता बेस्टच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकबसेस देखील मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी