29 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरमुंबईमुंबईत मुसळधार पावसाचा हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका

मुंबईत मुसळधार पावसाचा हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका

मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची कालपासून तारांबळ उडाली आहे. आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचले असून हार्बर लाईनची लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झाला. मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन उशारा धावत आहेत. पावसामुळे हार्बर वडाळा-मानखुर्द डाऊन मार्गावरील सेवा ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसामुळे कुर्ला स्थानकानजीक रेल्वे ट्रॅकपूर्णपणे पाण्याखाली गेला होता मात्र आता या पाण्याचा निचरा केला असला तरी वडाळा ते मानखुर्द ही डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद असून अप मार्गावरील वाहतूक ही अर्धा तास उशिराने सुरू आहे. पावसाने उसंत न दिल्यास सायंकाळी कार्यालयातून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मणिपूरमध्ये नग्न धिंड काढलेल्या महिलांमधील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या माजी सैनिकाची पत्नी

आपदग्रस्तांच्या मदतीसाठी लालबागचा राजा आला धावून !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार

मुंबईत दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत अवघ्या तीन तासांत ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस सुरु असून मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून मुंबईतील काही रस्त्यांवर देखील पाणी आहे. दरम्यान दुपारी समुद्राला देखील भरती होती. मात्र तासाभरात भरती कमी झाली असून सखल भागातील पाणी देखील ओसरले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी