28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईमुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल इतिहासजमा होणार; मग रेल्वेप्रवासाची पर्यायी सोय काय?

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल इतिहासजमा होणार; मग रेल्वेप्रवासाची पर्यायी सोय काय?

नव्या पर्यायांमुळे, लोकलच्या सेकंड क्लास व सर्वच श्रेणीतील भाड्यात मोठी वाढ होणार का?

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल इतिहासजमा होणार आहे. मग रेल्वेप्रवासाची पर्यायी सोय काय? असा प्रश्न कुणालाही साहजिकच पडू शकेल. लोकल म्हणजे मुंबईच्या हृदयाची धडकन आहे, चाकरमान्यांच्या स्वस्त प्रवासाची हक्काची सोय आहे. ठराविक लोकल, ठराविक डबा आणि ठराविक ग्रुप .. ही वर्षानुवर्षे जपलेले नाते आता संपुष्टात येणार का? तुमच्या मनात अशा अनेक प्रश्नांची गर्दी झाली असेल नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत आणि प्रवासाच्या नव्या पर्यायांचीही माहिती देणार आहोत.

‘लोकल’ ट्रेन म्हणजे निःसंशयपणे मुंबईची जीवनरेखा आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात त्याला विशेष महत्त्व आहे. 16  एप्रिल 1853 च्या दिवशी, बोरी बंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत मुंबईतीलल पहिली-पहिली प्रवासी ट्रेन धावली. हीच पुढे सेंट्रल लाईन झाली. तेव्हापासून मुंबईत ट्रेन अव्याहतपणे धावत आहे. सतत विकसित होत जाणाऱ्या,  विस्तारणाऱ्या या कॉस्मोपॉलिटन शहराला लोकल ट्रेनने म्हणजेच किंवा उपनगरीय गाड्यांनी निरंतर गती दिलीय.

मुंबई लोकल ट्रेन्स म्हणजे या शहराच्या आणि मुंबईकरांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. मात्र, या लोकल ट्रेन्स लवकरच भूतकाळात जाणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील उपनगरीय ट्रेन नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली महत्त्वाकांक्षी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-III आणि 3A) राबविला जात आहे. त्याअंतर्गत रेल्वे बोर्डाने नुकतीच उपनगरीय रेल्वे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी मंजुरी दिली आहे.  त्यानुसार, हळूहळू सर्व लोकल ट्रेन या व्यवहारातून बाद केल्या जाणार आहेत.

उपनगरीय ट्रेन नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी, 238 वंदे भारत मेट्रो गाड्या खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आहे. म्हणजेच मुंबई लोकलचे आजवरचे नेहमीचे डबे (रेक) बदलून आता वंदे भारत लोकल चालविली जाणार आहे. मुंबई लोकल ट्रेनऐवजी आता वंदे भारत मेट्रो धावणार आहे. त्यामुळे लोकलच्या सेकंड क्लास व सर्वच श्रेणीतील भाड्यात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

मुंबईत नव्या वंदे भारत लोकल ट्रेन्सची निर्मिती मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांनुसार तंत्रज्ञान भागीदाराद्वारे केली जाईल. ही खरेदी MRVC द्वारे केली जाईल. 35 वर्षांच्या देखभाल करारासह (मेंटेनन्स कॉंट्रॅक्ट) ही खरेदी होईल.  MUTP-III आणि 3A अंतर्गत आधीच मंजूर झालेल्या रेकच्या देखभालीसाठी तंत्रज्ञान भागीदार दोन डेपो तयार करेल. MUTP-III आणि MUTP-3A या प्रकल्पांची किंमत अनुक्रमे 10,947 कोटी रुपये आणि 33,690 कोटी रुपये आहे.

मुंबई लोकल ट्रेनऐवजी आता वंदे भारत मेट्रो धावेल. ही मेट्रो म्हणजे एक अत्याधुनिक रेक असेल, जो जवळपास 100 किलोमीटर अंतरावरील शहरांना जोडेल. या प्रवासासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. वंदे भारत मेट्रो ही वंदे भारत एक्सप्रेसची मिनी आवृत्ती असेल. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन आहे. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, देशातील 100 किलोमीटर अंतरापर्यंतची शहरे जोडण्यासाठी वंदे भारत मेट्रो जाहीर करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्री म्हणाले, फलाटावर उभे राहिलो की आपण लोकलच्या आत आपोआप जातो

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

नव्या वर्षांत धावत्या लोकलमध्ये मिळणार निःशुल्क वायफाय

सध्या पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वे (CR) द्वारे मुंबईत हार्बर व ट्रान्स-हार्बरसह एकूण चार उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर चालविले जातात. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील 319 किलोमीटर अंतर जोडले जाते. या मार्गांवर एसी लोकलसह दिवसभरात एकूण 3,129 फेऱ्या चालविल्या जातात. रोजची एकूण लोकल प्रवासी संख्या सरासरी 40 लाख इतकी आहे.

Mumbai Local Trains Will Be History, Mumbai Local Journey Became Costly, Railway Upgrading Mumbai Local, Mumbai Local, Mumbai Local Trains

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी