36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeमुंबईMumbai News : डोंबिवलीत रंगलेला 'मनी हाईस्ट'सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत...

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

मुंबईतील डोंबवली भागात चोरीचा एक थरार समोर आला आहे. आयसीआयसीआयच्या बॅंक कर्मचाऱ्यांनीच बॅंकेच्या तिजोरीतून 12 कोटी रुपये लंपास केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील डोंबवली भागात चोरीचा एक थरार समोर आला आहे. आयसीआयसीआयच्या बॅंक कर्मचाऱ्यांनीच बॅंकेच्या तिजोरीतून 12 कोटी रुपये लंपास केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जबर चोरीनंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवल्यामुळे चोरी करणाऱ्या या टोळीतील तीन जणांना पकडण्यात यश आले आहे. इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी असे अटक करण्यात आलेल्या तीघांची नावे आहेत. दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कस्टोडियन अल्ताफ शेख आणि त्याची बहिण निलोफर यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मनी हाईस्ट ही वेबसिरीज पाहून या संपूर्ण चोरीचा कट रचल्याची बाब उघड केली आहे.

जुलै महिन्यात डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात स्थित असेलल्या आयसीआयसीआय बँकेतून तब्बल 12 कोटी रुपयांची रक्कम चोरी झाल्याची घटना समोर आली होती. इतक्या प्रसिद्ध बँकेतून एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रोकड चोरी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता. याप्रकरणात मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली. तपासादरम्यान या बँकेत काम करणाऱ्या कॅश मॅनेजर अल्ताफ शेखने आपल्या साथिदारांसह ही रक्कम चोरली असल्याची माहिती उघड झाली. पोलीस या टोळीच्या मागावर होते. या प्रकरणात पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना ऑगस्टमध्ये अटक केली मात्र अल्ताफ पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हते. मानपाडा पोलीस त्याच्या मागावर होते. अटक केलेल्या तिघांकडून धक्कादायक माहिती समोर आली.

हे सुद्धा वाचा

Weather Change Effects : बदलत्या हवामानात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचे नियमित पालन करा

Mumbai Rape Case : मुंबईतील धक्कादायक बलात्कार प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा

Thackeray Vs Shinde : वादग्रस्त दसरा मेळाव्यानंतर ठाकरे – शिंदे लग्नबेडीत, पत्रिका व्हायरल

अल्ताफ शेख याने मनी हाईस्ट ही वेब सिरीज पाहिल्यानंतर त्याला ही चोरीची कल्पना सुचली असल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याने लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी हा संपूर्ण डाव रचला असल्याचेही कबूल केले आहे. तो बँकेत कॅश कस्टडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेतील सर्व सुरक्षा व्यवस्थेची माहिती होती. हा कट यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी त्याचे मित्र इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी यांनी त्याला मदत केली असल्याचेही उघड झाले आहे.

9 जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून त्याने तिजोरीतून 34 कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने आपल्या कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी नावाच्या तीन मित्रांना बोलवून 34 कोटींपैकी सुमारे 12 कोटी त्यांच्याकडे सोपवले. मात्र उरलेले पैसे त्याला घेता आले नाहीत. या दरोड्याचा गुंता सोडवण्यात अखेर मानपाडा पोलिसाना यश आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी