38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeमुंबईMumbai News : सोने चोरणाऱ्या चोरांनी लढवली अजब शक्कल, वाचा नेमकं काय...

Mumbai News : सोने चोरणाऱ्या चोरांनी लढवली अजब शक्कल, वाचा नेमकं काय घडलं

मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले सोने पावडर करून मेणाचा आकार देऊन आतील कपड्यांमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेले दोघेही भारतीय वंशाचे आहेत. हे सोने दोन पॅकेटमध्ये लपवून ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये एक पुरुष आणि एक महिला आहे.

दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना कस्टम अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांच्याकडून 3.07 किलो सोने जप्त केले. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 1.63 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले सोने पावडर करून मेणाचा आकार देऊन आतील कपड्यांमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेले दोघेही भारतीय वंशाचे आहेत. हे सोने दोन पॅकेटमध्ये लपवून ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये एक पुरुष आणि एक महिला आहे.

सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एका पुरुष आणि महिलेला अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेथून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अलीकडेच महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने सांगितले की, जप्त केलेल्या दारूची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 80 कोटींहून अधिक आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : सोने चोरणाऱ्या चोरांनी लढवली अजब शक्कल, वाचा नेमकं काय घडलं

T20 World Cup : हिटमॅनच्या नेतृत्वात भारत ठरणार चॅम्पियन! वाचा ऑस्ट्रेलियात कोणत्या संघाचा दबदबा

Four More Shots Please 3 Trailer : खोडकरपणाने भरलेला ‘फोर मोअर शॉट्स प्लीज 3’ वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज

बिनू जॉन असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा केरळचा आहे. डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला विमानतळावर पोहोचताच ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या सामानाची तपासणी केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिनूच्या सामानाची तपासणी केली असता पोलिसांना त्यांच्याकडून काहीही मिळाले नाही. मात्र त्याच्या ट्रॉली बॅगची झडती घेतली असता त्यातून हेरॉईन सापडले, जे तो कोणत्यातरी मार्गाने लपवून घेऊन जात होता.

डीआरआयने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून बिनूला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, एका परदेशी नागरिकाने हे सोने भारतात नेण्याच्या कामासाठी कमिशन म्हणून एक हजार अमेरिकन डॉलर्स दिले होते. सदर पळवलेले सोने कोणाच्याच लक्षात येऊ नये म्हणून या चोरट्यांनी डोकं चालवून भलतीच शक्कल लढवली पण ती शक्कल आता त्यांच्याच अंगाशी आली आहे.

चोरीच्या अनेक घटनांमध्ये चोरटे दरवेळी वेगवेगळी शक्कल लढवून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा ते पकडले जातात तर कधी त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होतात. दुबईवरून आलेल्या या चोरट्यांच्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याची पावडर करून मेणाचा आकार देऊन आतील कपड्यांमध्ये लपवून सुद्धा कस्टम अधिकाऱ्यांच्या ते नजरेस पडलेच त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी