32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeमुंबईMumbai News : फटाके न उडवण्याचा सल्ला देणाऱ्या तरुणाची हत्या! तिघेही आरोपी...

Mumbai News : फटाके न उडवण्याचा सल्ला देणाऱ्या तरुणाची हत्या! तिघेही आरोपी अल्पवयीन

गोवंडी येथे एका 21 वर्षीय तरुणाला काचेच्या बाटलीतील फटाके फोडण्यापासून रोखल्यानंतर तीन तरुणांनी हल्ला करून तिची हत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिवाळी हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. यावेळी दिव्यांची रोशनाई संपूर्ण देशाला उजळून टाकते. शिवाय फटाक्यांच्या आतिशबाजीने सर्वत्र आनंद पसरत असतो. मात्र, यावर्षीच्या दिवाळीत फटाक्यांमुळे ग्रहण लागल्याचे चित्र महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत पाहायला मिळाले. 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला काचेच्या बाटलीत फटाके न उडवण्याचा सल्ला देणाऱ्या तरुणाला आपला जीव यावेळी गमवावा लागला. सोमवारी (24 ऑक्टोबर) मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी येथे एका 21 वर्षीय तरुणाला काचेच्या बाटलीतील फटाके फोडण्यापासून रोखल्यानंतर तीन तरुणांनी हल्ला करून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी 14 आणि 15 वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे, तर आणखी एक 12 वर्षीय आरोपी फरार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात दुपारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणाने 12 वर्षांच्या मुलाला काचेच्या बाटलीत फटाके टाकताना पाहिले आणि त्याला थांबवले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि अन्य दोन आरोपींनी तरुणाला मारहाण सुरू केल्याचे त्याने सांगितले. त्याने सांगितले की, 12 वर्षीय मुलाने त्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याच्या मानेवर वार केले. पोलिसांनी सांगितले की, जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : फोन रिपेअरिंगला दिला अन् बँकेतून 2 लाख गायब झाले! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

T20 World Cup : पाकिस्तानी संघ सेमी फायनलपूर्वीच करणार घरवापसी! भारताचा मार्ग मोकळा

SBI New Scheme : एकदा पैसै टाका अन् महिनाभर नफा कमवा! ‘एसबीआय’चा नवा प्लॅन माहितीये का?

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले
वास्तविक, ही घटना मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी येथील आहे. जिथे सोमवारी, काचेच्या बाटलीतील फटाके फोडण्यापासून रोखल्यानंतर 21 वर्षीय तरुणावर तीन तरुणांनी प्रथम हल्ला केला. यानंतर धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. यासह पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी त्याचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. पोलिसांनी जखमी व्यक्तीला प्रथम रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिस पुढील तपास करत असून लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील तिनही आरोपी अल्पवयीन असल्याचे प्रामुख्याने जाणवले आहे. त्यामुळे या आरोपींना कडक शिक्षा होण्याची शक्यता कमी असली तरीही शक्य तितकी कडक कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी