33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईMumbai Police : मुंबईच्या माजी आयुक्तांना सीबीआयकडून अटक, वाचा काय आहे प्रकरण

Mumbai Police : मुंबईच्या माजी आयुक्तांना सीबीआयकडून अटक, वाचा काय आहे प्रकरण

2009 ते 2017 दरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे.

सध्या महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालत घडत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या प्रशासन विभागाला हादरा देणारी एक बातमी समोर आली आहे. 2009 ते 2017 दरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. पांडे आधीच न्यायालयीन कोठडीत होते आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद होते. आता त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती, ज्याने या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले आहे. आता, सीबीआयने त्याला अटक केली आहे आणि दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात रिमांड याचिका देखील दाखल केली आहे, ज्याने पांडे यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

पांडे यांनी दोन महिन्यांपूर्वी जबाब नोंदवला होता. केंद्रीय तपास यंत्रणा आता काही कागदपत्रांसह पांडेचा सामना करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार, सीबीआयने फोन टॅपिंग प्रकरणात एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील सीबीआय मुख्यालयात पांडे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सीबीआयच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने मुंबई, पुणे आणि देशातील अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

हे सुद्धा वाचा…

IND vs AUS T20I : सिरीज डिसाईडरमध्ये कशी असेल खेळपट्टी,हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11

PFI Scam : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याच नाहीत, पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण

ODI ENGW vs INDW : भारतीय महिला संघाने इंग्रजांचा बदला घेतलाच! घरच्या मैदानावर दिलाय व्हाईट वॉश

सीबीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 2009 ते 2017 दरम्यान रामकृष्ण आणि पांडे यांनी एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते. “पांडे आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड चालवायचे. रामकृष्णने एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्यासाठी या फर्मचा वापर केल्याचा आरोप आहे. एनएसई कर्मचाऱ्यांनी सकाळी 9 ते 10 दरम्यान केलेले फोन कॉल्स गया टॅप केले आणि आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडने रेकॉर्ड केले. पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करण्याची सुविधा दिली, असा आरोप आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणात सध्या वेगाने हालचाली घडत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र, एका प्रतिष्ठीत प्रशासकिय अधिकाऱ्याने आपल्या पदाचा केलेल्या गैरवापर निषेधार्ह असल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे आता सीबीआय लवकरच या प्रकरणातील तपास पुर्ण करून योग्य तीा कारवाई करेल आणि समाजात एक उदाहरण रुजू करण्याचा प्रयत्न करेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी