29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईमुंबई पोलिसांच्या 'मुस्कान' अभियानामुळे पालकांच्या चेहऱ्यावर आले हसू

मुंबई पोलिसांच्या ‘मुस्कान’ अभियानामुळे पालकांच्या चेहऱ्यावर आले हसू

टीम लय भारी

मुंबई : मुंबई पोलीस हे नेहमीच त्यांच्या कामगिरीमुळे सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतात. मुंबई पोलिसांच्या अशाच कामगिरीचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी ‘मुस्कान’ अभियाना अंतर्गत तब्बल १७५ मुलांची सुटका केली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईत हरवलेल्या १७५ मुलांचा मुंबई पोलिसांकडून शोध लावण्यात आला आहे. तर याच अंतर्गत १५ बालमजुरांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी जून महिन्यात ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. मुस्कान अभियान हे हरवलेल्या मुलांसाठी राबविण्यात येणारे अभियान आहे. या अभियानाअंतर्गत हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. मुंबईमध्ये या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडत असल्याने मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरु केले आहे.

या अभियानाअंतर्गत जून महिन्यात हरवले म्हणून नोंद असलेल्या एकूण १३७ मुलांचा शोध घेण्यात आला. यामध्ये १०२ मुली तर ३५ मुलांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे नोंद नसलेल्या हरवलेल्या ३८ मुला-मुलींची सुटका पण मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आह. त्यामुळे मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वच कौतुक करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांकडून १५ बाल मजुरांना पण ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे हरवलेल्या मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावर ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे हसू आले आहे. मुंबई पोलीस कायमच आपल्या कार्यतत्परतेतून सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतात. जर कोणाची लहान मुले हरवली असतील तर, त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :

कर्मठ पुरूषी विचारांना चपराक; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

नंदुरबारमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे लाखो रुपयांचे साहित्य भंगारात

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी