26 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमुंबईमुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या !

मुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या !

टीम लय भारी

मुंबई : गेल्या १५ दिवसांत मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पण मध्येच पावसाने विश्रांती घेतल्याने आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शहरात नागरिकांच्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर साथीच्या आजारांनी सुद्धा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असतानाच साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने खबरदारी घेत उपयाययोजना कराव्यात, याबाबतचे पत्र आमदार अमित साटम यांनी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पाठवले आहे.

मुंबईत गेल्या आठ दिवसात साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. तर डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळून आले आहेत. तर रोज लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तर स्वाईन फ्लू च्या रुग्णांची देखील नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी. तसेच कोरोना आणि स्वाईन फ्लू या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरत आहे. पण या आजारांना घाबरून न जात नागरिकांनी मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे यांसारख्या खबरदारी घ्याव्यात.

हे सुद्धा वाचा :

काळजी घ्या! कोरोनानंतर वाढले आता ‘स्वाईन फ्लु’चे संकट

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू, यावर कसा तोडगा निघणार?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!