33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमुंबईMunicipal Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार

Municipal Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. गणेशोत्सवाचा मुहुर्त काढत शिंदे, भाजप आणि मनसे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर निवडणुकीचे रिंगण गाजवणार अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीची तयारी सुरू असली तरीही नेमक्या निवडणुका कधी लागणार असा प्रश्न अनुत्तरीत राहत होता, परंतु महापालिकेच्या निवडणुकांचे बिगूल दिवाळीनंतरच वाजणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात सत्तांतरानंतर राजकीय गणितांची जुळवाजुळव करताना शिंदे – फडणवीस सध्या कमालीचे व्यस्थ असल्याने दिवाळीनंतर या निवडणुका घेण्याचे राज्य सरकारकडून विचार करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या सुद्धा निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार असे अंदाज बांधण्यात येत आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत असून या निवडणुकीसाठी कंबर कसली जात आहे. आतापर्यंत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत होता परंतु शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे आता महापालिकेवर कोणाचे वर्चस्व असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा पुढे सरसावले आहेत.

Municipal Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार

हे सुद्धा वाचा…

Asia Cup 2022 : श्रीलंकेशी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल?

political party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

Mahadev Jankar : महादेव जानकर हे निर्मला सीतारमण यांच्यापेक्षाही सरस !

दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेगटात आणि भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटी देण्याच्या माध्यमातून वेगवेगळे नेतेमंडळी आणि संबधित मंडळांना भेटी देत आहेत. या गणपती दर्शनाचे निमित्त साधत ठाकरे गटात उरल्या सूरलेल्या लोकांना सुद्धा शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे फार प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी शिंदे गट, भाजप आणि मनसे यांची कमालीची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, शिवाय सिद्धीविनायक गणपतीचे सुद्धा दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी भाजपच्या मुंबई महापालिका मिशनचा श्रीगणेशा केला. दौऱ्यादरम्यान, अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, या बैठकीनंतर मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्याचे निश्चित करीत त्यांनी आखलेल्या मेगा प्लॅनची माहिती समोर आली आहे. भाजपसोबत शिंदे आणि मनसे यांनी हात मिळवला तर 80-30-40 चा फॉर्म्युला वापरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी