31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमुंबईभारतातील पहिल्या 'नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड'चे जाणून घ्या फायदे

भारतातील पहिल्या ‘नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड’चे जाणून घ्या फायदे

टीम लय भारी

मुंबई : देशभरात मेट्रो, बस, रेल्वे यांसह सर्व प्रकारच्या स्थानिक प्रवासासाठी सामायिक सुविधा असावी, प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (National Common Mobility Card) एकच सामायिक कार्ड ही संकल्पना लागू करण्यात आली. आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. असे मुख्यमंत्र्यानी उद्गाटनाच्या वेळी सांगितले.(National Common Mobility Card of India’s first)

बेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री ठाकरेंनी केले. मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे (National Common Mobility Card) अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला… पुढे चला म्हणूत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. अशा पध्दतीत मुख्यमंत्र्यानी बेस्टचे कौतुक केले.

‘नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड’चे फायदा

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेचा कायापालट करण्याचे नियोजन एमएमआरडीए करत आहे. त्यानुसार मेट्रोचे जाळेही विस्तारले जाणार आहे. अनेक ठिकाणी नव्याने उड्डाणपुलांच्या निर्मितीचेही कामे चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो, मोनो, बेस्ट, उपनगरीय रेल्वे आणि महानगर क्षेत्रातील परिवहन सेवांमधील वाहतूक एकाच तिकिटावर करणे सुलभ व्हावे म्हणून साधारण पाच वर्षांपासून एकात्मिक तिकीट प्रणाली राबवण्यासाठी एमएमआरडीए (National Common Mobility Card) प्रयत्नशील होती.

मात्र या प्रणालीऐवजी केंद्राने वन नेशन वन कार्ड म्हणजेच नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्डचा  (National Common Mobility Card) आग्रह धरला आणि ही प्रक्रिया पुन्हा राबवावी लागली. त्यामुळे बराच वेळ लागला. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रकल्पासाठी सर्वप्रथम ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गातील पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या मदतीने एमएमआरडीए ही प्रणाली राबवणार आहे.

प्रवास हा विकासाचाही असायला हवा त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही ईझ ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” (National Common Mobility Card) एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले.

हे सुध्दा वाचा :- 

BEST National Common Mobility Card: How to Recharge and Where All Can You Use it?

मुंबई पोलिसांची बदनामी महाराष्ट्र सहन करणार नाही, कॉंग्रेसचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी