28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, सिडकोने दिली माहिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, सिडकोने दिली माहिती

टीम लय भारी

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील एकूण तीन हजार ७० बांधकामे पाडण्यात आली. एक हजार १६० हेक्टर क्षेत्रफळ विमानतळ सवलतदार यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. (Navi Mumbai International Airport project completed)

या गावांतील सुमारे पाच हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रातील पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे सिडकोने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. विमानतळ (Navi Mumbai International Airport) क्षेत्र विकासकामांसाठी सज्ज झाले आहे.

विमानतळ गाभा क्षेत्रातील तीन हजार ७० इमारती सिडकोकडून पाडण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील पाच हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात स्थलांतर (Navi Mumbai International Airport) करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

सार्वजनिक वापरातील इमारती, चर्च तसेच सार्वजनिक व खासगी मालकीची मंदिरे मिळून एकूण ५६ मंदिरांचे पुनर्वसन क्षेत्रात स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने मूर्तींची सन्मानपूर्वक (Navi Mumbai International Airport) प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. समाज मंदिर, शाळा आणि स्मशानभूमी मिळून एकूण २७ बांधकामे पाडण्यात आली आहेत.

विमानतळ क्षेत्रातील महत्त्वाची विकासपूर्व कामे यापूर्वीच पूर्ण झाली आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) प्रकल्प नियोजित वेळेनुसार पार पडत असून हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Navi Mumbai International Airport: CIDCO achieves milestone as it clears airport site

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी भाजप महाराष्ट्राचे अभिनंदन केले

राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उदघाटन

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी