31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमुंबईGood News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन...

Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !

पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला मुंबईला भेटीत मुंबई मेट्रो मार्ग 2ए आणि 7 तसेच नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई मेट्रोचा खारघर सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यानचा 5.96 किमी लांबीचा मार्ग पूर्ण झाला असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबईला भेट देणार आहेत.

नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (Navi Mumbai Metro) पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला मुंबईला भेटीत मुंबई मेट्रो मार्ग 2ए आणि 7 तसेच नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई मेट्रोचा खारघर सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यानचा 5.96 किमी लांबीचा मार्ग पूर्ण झाला असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (एमएमआरडीए) अजून पंतप्रधानांकडून या मार्गांच्या उद्घाटन कार्यक्रमाची पुष्टी केलेली नाही. एमएमआरडीएनेच एलिव्हेटेड मुंबई मेट्रो 2ए आणि 7 या लाईन्स बांधल्या आहेत. गेले कित्येक दिवस या मार्गांच्या उद्घाटनाबाबत सरकारकडून तारखा मिळविण्यासाठी एमएमआरडीएची धडपड सुरू आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. 2ए आणि 7 हे दोन्ही मेट्रो मार्ग लिंक रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेमधून जातात. त्यामुळे या प्रमुख रस्त्यांवरील रहदारी कमी होईल; तसेच विद्यमान उपनगरीय लोकल ट्रेन सेवेतील गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या दोन मार्गांवर 30 स्थानके आणि 35 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असतील. हा संपूर्ण भाग कार्यान्वित झाला की, दररोज सुमारे 3 लाख प्रवासी या मार्गांवरून जातील, असे मेट्रो रेल्वेचे संचालन आणि देखभाल करणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईला भेट देणार आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 हा 35 किमी लांबीचा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकांदरम्यानच्या 5.96 किमी लांबीच्या मेट्रोच्या मार्गाचेही उद्घाटन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबईला भेट देणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ते 19 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसला जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीच्या संधी मिळविण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची असते. जर पंतप्रधान मेट्रो उद्घाटन करणार असतील, तर हे दोघे त्या कार्यक्रमासाठी दावोस भेट रद्द करतील किंवा अर्धवट टाकून लवकर परत येतील, अशी चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा : 

VIDEO: मेट्रोच्या ॲक्वा लाईन 3 च्या बोगद्यातील चाचणी प्रवास

आरेतील मेट्रोशेडवरील बंदी मुख्यमंत्र्यांनी हटवली, आंदोलने आणखी आक्रमक होणार?

नवी मुंबईच्या मेट्रोबद्दल एकनाथ शिंदे यांचा आदेश

एप्रिल 2022 मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील धनुकरवाडी (कामराज नगर) ते आरे कॉलनीपर्यंतच्या 20 किमी लांबीच्या 2A आणि 7 लाईनच्या पहिल्या टप्प्यातील कामाला झेंडा दाखवला होता.

Navi Mumbai Metro, नवी मुंबई मेट्रो, Central Park To Belapur, PM Narendra Modi, खारघर सेंट्रल पार्क ते बेलापूर

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी