32 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरमुंबईनवरात्रीच्या खरेदीसाठी बाजारात लगबग वाढली

नवरात्रीच्या खरेदीसाठी बाजारात लगबग वाढली

नवरात्रीसाठी काही दिवस उरलेले असताना मुंबईत बाजारहाट करून नवनव्या डिझाईनचे ट्रेडिंग कपडे, नवी फॅशन जाणून घेण्यासाठी गर्दी भलतीच वाढली आहे. यंदा नवरात्रोत्सवात कपडे दागिन्यांसह मेहंदी आणि टॅटू गोंदवून घेण्यासाठी तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविधतेवर टॅटू काढला जात आहे. पाठीवर, हातावर नाविन्यपूर्ण टॅटू तरुणाईचा स्टाईल सिम्बॉल बनला आहे. गरबा खेळण्यासाठी पारंपारिक आणि पाश्चिमात्यचा समतोल साधणारे डिझाईन्स कपडे खरेदीत प्राधान्याने पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यांपासून टॅटूचा बिजनेस तेजीत सुरू आहे. बोटाच्या आकाराचा टॅटू काढण्यासाठी किमान ५० रुपये आकारले जात आहेत. मोठे टॅटू हातावर दंडावर मानेवर काढण्यासोबतच पाठीवर काढण्यात तरुणाईची विशेष पसंती आहे.
बॅकलेस ब्लाऊजवर पाठीवरील टॅटू कुठून दिसत असल्याने तरुणींकडून पाठभर टॅटू काढले जातात. या मोठ्या आकाराच्या टॅटूची किंमत दोन हजारांच्या घरात पोहोचली आहे. दर्शनीय भागात ब्लॅकमार्करद्वारे भगवान शिव, दांडिया किंवा त्रिशूल या टॅटुना जास्त मागणी आहे.
दांडियाला पारंपारिक साज
 गरब्याला ठेका धरण्यासाठी मदत करणाऱ्या दांडियाला आता पारंपारिक साज  चढला आहे. विविध प्रकारे सजवलेल्या दांडिया बाजारात दिसून येत आहेत. यात लाकडी, मेटल, लाईटवाली एप्रिलपासून तयार झालेल्या दांडिया, बांधणी टिपरी, चुनरी दांडिया, डिस्को टिपरी आणि बेरिंगवाली दांडिया यांचा समावेश आहे. खास लाइटिंग मला दांडी आहे बाजारात उपलब्ध झाले आहेत. विविध रंगाच्या लेस, डायमंड, कुंदन, गोंडे, आरशांनी आकर्षक सजावट केलेल्या लाकडी दांडीयाही उपलब्ध झाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा 
 सध्या थ्रेडपासून बनवण्यात येणाऱ्या क्रोशा ज्वेलरी आणि लोकरीच्या गोंड्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या दागिन्यांचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये बिंदीपासून नेकलेस, हार, कर्णफुले, बांगड्या, कंबरपट्टा, पैंजण आधीच पूर्ण मॅचिंग सेट दिला जातो. दागिने वजनाने हलके असल्याने त्यांची बाजारातील मागणी वाढली आहे. हे दागिने हाताने बनवले जातात. दागिन्यांचा हवा तसा आकार देता येतो. यासह ऑक्साईड आणि इमिटेशन ज्वेलरीही बाजारात उपलब्ध आहे.
 गोंडे, कवड्या यांनी सजलेल्या घागरा-चोली, गुजराती साड्या
 बाजारात सर्व दुकानात दिसून येत आहेत. मुलांमध्ये जॅकेटवाला कुर्ता सध्या विशेष मागणीत आहे. प्रौढ पुरुषांमध्ये ही धोती कुर्ता आणि स्टायलिश जॅकेटची मागणी आहे. वेस्टन लुक मध्ये काळ्या रंगाची जीन्स, ब्लॅक टी शर्ट, दुपट्टा स्टाईलने रॅप करण्याचा ट्रेंड आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी