30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईपैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

टीम लय भारी

ठाणे : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.(NCP is aggressive for the arrest of Nupur Sharma)

नुपूर शर्मा यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी (NCP) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा युवक अध्यक्ष तथा विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

यावेळी पठाण यांनी, महामानव आणि प्रेषीतांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करणेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करावा, नुपूर शर्मा यांना तत्काळ (NCP) अटक करावी, अशी मागणी केली. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई, भिवंडी तसेच मुंब्रा येथे एफआयर दाखल करण्यात आला आहे.

नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य माध्यमांवर चर्चेत आले होते. नूपूर शर्मा यांच्या विरोधात कलम भादंविच्या २९५ अ, १५३अ आणि ५०५ ब अंतर्गत गुन्हा दाखल (NCP) झालेला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी.

या मागणीसाठी मंगळवारी शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली शाकीर शेख, मैसर शेख, साकिब दाते, मर्जिया पठाण, नाजीम बुबेरे यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यांना तत्काळ (NCP) अटक करण्यात आली पाहिजे. तसेच, कोणत्याही धर्माच्या प्रेषित आणि महामानवांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी विरोधी नेते शानू पठाण यांनी केली.

हे सुद्धा वाचा :- 

Fresh case against BJP leader Nupur Sharma in Thane over Prophet Muhammad remark

हा धनगर तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही :  आमदार गोपीचंद पडळकर

शिवसेना, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार; कॉंग्रेस सतरंज्या उचलणार; मनसेचा टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी