33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबईशरद पवार, अजितदादांच्या ‘या’ आदेशाला राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडून केराची टोपली

शरद पवार, अजितदादांच्या ‘या’ आदेशाला राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडून केराची टोपली

टीम लय भारी

मुंबई : ‘भाजपच्या मंत्री अस्थापनेवरील अधिकाऱ्यांना आपल्याकडे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) पदावर घेऊ नका’, अशा सुचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. अजितदादांनीही सगळ्या मंत्र्यांना तशी तंबी दिली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या तीन मंत्र्यांनी शरद पवार व अजितदादांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

शरद पवार व अजितदादा यांनी केलेल्या सुचनेनंतरही या तीन मंत्र्यांनी भाजपच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात घेतल्याने मंत्रालयात हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या अन्य काही मंत्र्यांनीही जुने अधिकारी आपल्या अस्थापनेवर घेतले होते. परंतु शरद पवार व अजितदादांच्या सुचना आल्यानंतर या मंत्र्यांनी त्या जुन्या अधिकाऱ्यांची नियुक्ती स्थगित केली. पण तीन मंत्र्यांनी मात्र आपल्याच निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.

शरद पवार, अजितदादांच्या ‘या’ आदेशाला राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडून केराची टोपली
जाहिरात

दुसऱ्या बाजूला, शिवसेना व काँग्रेसने भाजपच्या अधिकाऱ्यांना आपल्या अस्थापनेवर घ्यायचे की नाही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेना व काँग्रेसच्या मंत्र्यांकडे भाजपचे अधिकारी मोठ्या संख्येने दिसत आहेत. विद्यमान मंत्री अस्थापनेवर जवळपास ३० टक्के अधिकारी भाजपचेच असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

मंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी