30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते 'रविकांत वरपे' यांनी दिले 'रामदास कदमां'ना सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘रविकांत वरपे’ यांनी दिले ‘रामदास कदमां’ना सडेतोड उत्तर

टीम लय भारी

मुंबई : माजी मंत्री आणि धडाडीचे नेते रामदास यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.  त्यानंतर आज कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही कदमांना प्रत्युत्तर देण्यात आलं. सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केली.

शरद पवारांनी डाव साधला, संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडली. अजित पवारांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे. त्याच्या जोरावर त्यांनीही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केला. रामदास कदमांनी हे लक्षात घेतले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या मागे जी महाशक्ती उभी आहे. त्या महाशक्तीने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडला आहे. त्याच महाशक्ती पुढे तुम्ही लोटांगण घालणार आहात.

आज तुमच्यासारखे जुने शिवसैनिक ज्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं मंत्रीपदे दिली. परंतु शिवसेना सोडण्यासाठी तुमच्याकडे काही कारण नसल्याने असे बेछूट आरोप पवारसाहेब व अजितदादांवर करत आहे. परंतु सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असं रविकांत वरपे यांनी म्हटलंय. शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी पवारांवर टीका केली. शरद पवारांनी डाव साधला. पक्ष फोडला. मी खूप अस्वस्थ आहे.  मी राजीनामा दिल्यानं मी समाधानी नाही. आनंदी नाही.  52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो.  याचा विचार करायला हवा. असे रामदास कदम म्हणाले होते.

हे सुध्दा वाचा:

‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजच्या टीझरवर भडकले बाबासाहेब पाटील

शरद पवारांच्या उपस्थितीत ‘मार्गारेट अल्वा’ यांनी भरला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज

सर्वांत धक्कादायक ! मोदी सरकारच्या काळात 4 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!