शहाडमध्ये सेंचुरी रेऑन कंपनीमध्ये शनिवारी सकाळी नायट्रोजन कंटेनरचा स्फोट झाला. यात एकाचा मृत्यु झाला असून चार जण जखमी आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या सागर झालटे ( ४४) या सेंचुरी रेऑन कंपनीतील कामगाराचा मृत्यु झाला आहे.
सेंचुरी रेऑन या कंपनीमध्ये (MH ४६ BB ४९७५) या नायट्रोजन कंटेनरचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये १ व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४ व्यक्तींना दुखापत झाली आहे व त्यांना उपचार करण्यासाठी फोर्टिस रुग्णालय, कल्याण व सेंचुरी रेऑन या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले आहे.
हे सुद्धा वाचा
वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, वनडे सह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल
गणपतीतील गर्दीवर नियंत्रण गरजेचे !
लालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण
या घटनेची माहिती दुपारी १२:१० वाजता ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी घेवून घेऊन मदत केली. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व सेंचुरी रेऑन कंपनीचे १ फायर वाहन उपस्थित होते. यात सागर झालटे (४४) या सेंचुरी रेऑन कंपनीतील कामगाराचा मृत्यु झाला. तर सागर झालटे. (४४), पंडित मोरे (वाहन चालक), प्रकाश निकम (३४), हंसराज सरोज (५२, ड्रायव्हर बरोबर मदतनीस) हे या कंपनीतील कामगार जखमी झाले आहेत.