28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमुंबईMaharashtra Assembly Session : सभागृहात मंत्री विजयकुमार गावितांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन, विरोधक चिडले

Maharashtra Assembly Session : सभागृहात मंत्री विजयकुमार गावितांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन, विरोधक चिडले

कुपोषणामुळे राज्यात मृत्यू झालेले नसून ते विविध आजारांमुळे झालेत असा अजब उत्तर देत विजयकुमार गावीत यांनी विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधक आणखीच संतापल्याचे पाहायला मिळाले.

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सुद्धा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जुंपल्याचे दिसून आले. आज सभागृहात विरोधी बाकाकडून कुपोषणाच्या वाढत्या चिंतेबाबतची माहिती आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांना विचारण्यात आली परंतु यावर गावीत यांनी कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही हाच सूर कायम ठेवला. या उत्तरावर विरोधी गटातील दिलीप वळसे पाटील मात्र संतप्त झाले. याआधी सुद्धा कुपोषणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विजयकुमार गावीत यांनी एकही मृत्यू नसल्याचे सांगत विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी सुद्धा तेच उत्तर कायम ठेवत कुपोषणामुळे राज्यात मृत्यू झालेले नसून ते विविध आजारांमुळे झालेत असे विधान केले. या विधानावर पाटील यांच्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गावीत यांना आज घेरले.

काल सभागृहात वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा सुरू असताना आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही असे सांगितले परंतु त्यावर प्रतिप्रश्न करीत अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी कुपोषण मृत्यूबाबत योग्य ती माहिती सभागृहाला द्यावी, उगाचच दिशाभूल करू नये अशी मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा हाच मुद्दा सभागृहात उपस्थित होताच गावीत म्हणाले, माझं उत्तर जशास तसं आहे आणि ते तसंच असेल. कुपोषणामुळे राज्यात मृत्यू झालेले नसून ते विविध आजारांमुळे झालेत असा अजब उत्तर देत गावीत यांनी विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधक आणखीच संतापले.

हे सुद्धा वाचा…

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

Maharashtra Assembly Session : गद्दारी केलेल्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे

Maharashtra Assembly Session : ‘शिंदे गटाची ताकद आता पन्नास खोक्यांपुरतीच?’

यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही हेच उत्तर पुन्हा दिलंय, मला त्यांच्याविरोधात हक्कभंग आणावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अजून काही सुधारित उत्तर द्यायचं असेल तर प्रयत्न करावा, असे म्हणून पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा पाटील यांच्या सूरात सूर मिसळत गावितांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले, मंत्र्यांचं हे अत्यंत असंवेदनशील उत्तर आहे, आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पुन्हा माहिती घेण्याची संधी दिली होती, तरी त्यांनी नीट माहिती घेतलेली नाही. राज्यात एकही मृत्यू होत नाही असं सरकारला वाटतं आणि ते अत्यंत अशास्त्रीय आहे. मंत्री म्हणतात कमी वजनामुळे मृत्यू झालाय, पण वजन कमी कशामुळे होतं? कुपोषणामुळेच वजन कमी होतं आणि त्यामुळेच मृत्यू होतात. बालमृत्यू का होतात या प्रश्नाकडे त्यांना वळायचंच नाही” असे म्हणून चव्हाण यांनी विजयकुमार गावितांना खडे बोल सुनावले.

कुपोषणाचा राज्यात वाढता आकडा दिसून येत असून सुद्धा मंत्री महोदयांच्या उत्तराने आदित्य ठाकरे सुद्धा संतापल्याचे दिसून आले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आदिवासी भागातली परिस्थिती कशी असते याची आपल्याला लाज वाटायला हवी, राखीव उत्तर होऊनही तेच तेच उत्तर दिलं जातंय असे म्हणत गावीतांना टोला लगावला आहे. अध्यक्षांच्या आदेशानंतर सुद्धा विजय कुमार गावीत यांनी या विषयाला गंभीरतेने न घेता तेच तेच उत्तर देण्यात धन्यता मानल्याने विरोधी गटातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी