29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईमार्चअखेरपर्यंत 'ही' कामे झाली नाही तर बसेल मोठा भुर्दंड

मार्चअखेरपर्यंत ‘ही’ कामे झाली नाही तर बसेल मोठा भुर्दंड

चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च सुरू आहे. या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

मार्च म्हणजेच चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ती न केल्यास माेठा भुर्दंड बसू शकताे. त्यात प्रामुख्याने आधार-पॅन जाेडण्यासह कर वाचविण्यासाठी हाेणाऱ्या गुंतवणूकीचा समावेश आहे.

आधार-पॅन जाेडणे : आधार आणि पॅन हे जाेडणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे. मात्र, यंदा ३१ मार्च २०२३ ही अखेरची मुदत असून त्यानंतर पॅन निष्क्रीय करण्यात येईल. ३० जून २०२२ पासून आधारला पॅन जाेडण्यासाठी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. (Pan-aadhar link)

मार्चअखेरपर्यंत 'ही' कामे झाली नाही तर बसेल मोठा भुर्दंड

करबचतीसाठी गुंतवणूक : २०२२-२३ या आर्थिक वर्षात करबचत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी याेजना, ईएलएसएस, जीवन वीमा इत्यादींमध्ये गुंतवणूक करून ८०सी अंतर्गत करबचत करू शकता.

मार्चअखेरपर्यंत 'ही' कामे झाली नाही तर बसेल मोठा भुर्दंड

पीएम वय वंदना याेजना : ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना याेजनेत गुंतवणूक करण्यासाठी हा पर्याय आहे. याेजनेला ३१ मार्च २०२३ नंतर मुदतवाढ देण्याबाबत सरकारने काेणतेही नाेटीफिकेशन जारी केलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठांना ही अखेरची संधी आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही पेन्शन याेजना आहे.

मार्चअखेरपर्यंत 'ही' कामे झाली नाही तर बसेल मोठा भुर्दंड

म्युच्युअल फंडमध्ये नामांकन : म्युच्युअल फंडमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड पाेर्टफाेलिओमध्ये नामांकन करणे आवश्यक आहे. अनक जण याकडे दुर्लक्ष करतात. सर्व फंड हाउसेसनी यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर खाते गाेठविले जाण्याची शक्यता आहे.

Is it right time to invest in mutual funds? Which funds to choose for better returns? Find out | The Financial Express

हे सुद्धा वाचा : 

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला महाराष्ट्र अर्थसंकल्प ९ मार्चला…

शाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांना ‘आधार’ अनिर्वाय

‘आरटीई’च्या प्रवेशांसाठी आता पॅनकार्ड बंधनकारक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी