27 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरमुंबईMumbai News : मुंबईत पाळीव कुत्रे फिरवणाऱ्यांनी सावधान !

Mumbai News : मुंबईत पाळीव कुत्रे फिरवणाऱ्यांनी सावधान !

पाळीव कुत्रे फिरविणाऱ्यांना आता अधिक दक्षता बाळगावी लागणार आहे. कारण जर का पाळीव कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर, त्या कुत्र्यांच्या मालकाकडून दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.

सध्याच्या काळात अनेक लोक असे आहेत ज्यांनी आपल्या घरी कुत्रे पाळण्यास सुरुवात केली आहे. काही लोक हौस असल्यामुळे तर काही लोक त्यांना खरच कुत्रे आवडत असल्यामुळे कुत्रे पाळत आहेत. अनेकवेळा कुत्रे पाळल्यावरून अनकेलोकांमध्ये वाद देखील झाल्याचे पाहायला मिळते. पण मुंबईत राहणाऱ्या आणि कुत्रे पाळण्याचे हौस असलेल्या लोकांना आता जास्तीची खबरदारी घ्यावी लागणार आहे. सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांना आता कुत्रा रस्त्याच्या कडेला किंवा बागेत घाण पसरणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण जर का तुम्ही पाळत असलेल्या कुत्र्याने अस्वच्छता पसरवताना पकडल्यास बीएमसी मालकाकडून 500 रुपये दंड वसूल करणार आहे. त्याची सुरुवात मुंबईतील सर्वात पॉश एरिया कुलाबा येथून होणार आहे.

बीएमसीच्या उपायुक्त (घनकचरा) चंदा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 24 वॉर्डांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. यासाठी सर्व वॉर्डांमध्ये राहणारे उपद्रव शोधक (BMC कर्मचारी) ची सेवा घेतली जाणार आहे. मुंबईतील बहुतेक लोक सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फिरायला जातात. यावेळी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र

Maharashtra Politics : वडील शिंदे गटात तर मुलगा म्हणतो मी ठाकरेंसोबतच

Bigg Boss Hindi : काँग्रेस नेत्याने उचलला मराठमोळ्या शिव ठाकरेवर हात !

मुंबईत भटक्या कुत्र्यांवर बीएमसी अनेक मोहिमा राबवते. ज्यामध्ये मिशन रेबीज फ्री, नसबंदी यांसारख्या मोहिमांचा समावेश आहे. मात्र सोसायटीपासून ते रस्ता, उद्यान, चौपाटीपर्यंत पाळीव कुत्र्यांमुळे पसरलेली अस्वच्छता लोक सहन करतात. मुंबईतील श्वान मालक त्यांना सकाळ-संध्याकाळ फिरविण्याच्या बहाण्याने सार्वजनिक ठिकाणी घेऊन जातात. जिथे कुत्रे शौच करतात आणि त्यामुळे त्याठिकाणी दुर्गंधी पसरते. ज्यामुळे अनेकवेळा सामान्य नागरिक आणि कुत्रा मालक यांच्यात वादही होतात. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने पाळीव कुत्र्यांवर पाळत ठेवून दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि मोकळ्या जागेत शौचास जाणे टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल नेमले आहेत. या मार्शल्सनी कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर थुंकणे, मास्कशिवाय असणाऱ्या लोकांकडून 200 रुपये दंड आकारला जात होता. परंतु क्लीनअप मार्शलचा करार मार्चमध्ये संपला. परंतु आता लवकरच क्लीनअप मार्शलची नियुक्ती करून सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणाऱ्या पाळीव कुत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!