30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईNarendra Modi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट ?; मुंबई...

Narendra Modi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट ?; मुंबई पोलिसांना ऑडिओ मेसेज

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांकडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा ऑ़डिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांकडून रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बाबत मुंबई पोलिसांना एक ऑडिओ मेजेस आला असून याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांकडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा ऑ़डिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आला आहे. या धक्कादायक मेसेजनंतर पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मोदींना यापूर्वीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकीकडे ‘भारत जोडो यात्रा’ करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे देखील निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.

नेमका काय आहे मेसेज?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याचा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिली आहे. असा उल्लेखही त्यामध्ये आहे. एका अज्ञात इसमानं दावा केला होता की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं आहे.

पोलीस यंत्रणा दक्ष
दरम्यान याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला मेसेज पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. मोदींना यापूर्वीही ही धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.

हे सुध्दा वाचा

Dharavi Bank: गुन्हेगारीत भिजलेल्या धारावीचं रहस्य उलगडणार! सुनील शेट्टीची पहिली वेब सिरीज रिलीज

Supriya Sule : ‘श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करा!’ सुप्रिया सुळेंची मागणी

Saving Account Tips : ‘या’ 7 बँका बचत खात्यावर देतात 7% ते 7.30% व्याज, आजच जाणून घ्या

पंतप्रधानांना या आधी देखील अनेक वेळा धमक्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची यावर्षी ऑगस्ट महिन्यातही धमकी आली होती. त्यात ‘एनआयए’ला एक मेल आला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहे असे देखील म्हटले होते. शिवाय ई-मेल पाठवणाऱ्याने आपले दहशतावद्यांशी संबंध आहेत. या कटाचा खुलासा होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी