27 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमुंबईपंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील 'हे' बदल

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. १९) रोजी मुंबई दौऱ्यावर (PM Modi Mumbai visit) येत आहेत. मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २ ‘अ’ चे (Mumbai Metro) लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. तसेच उद्या (गुरुवार, दि.१९) रोजी दुपारी ४.३० वाजलेपासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल (Changes transportation routes) असणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे. नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुंबई पोलीस प्रशासनाने केले आहे. नागरिकांना काही समस्या असल्यास पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा देखील पोलिसांनी केले आहे. (PM Modi Mumbai visit changes in the transport system)

या मार्गावर असेल वाहनांना प्रवेश बंदी
पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलिंककडून बिकेसी-कुर्ल्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना कौटुंबिक न्यायालय जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यास बंदी असणार आहे. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना आयकर विभाग जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्यास बंदी असेल. खेरवाड़ी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्यास प्रवेश बंदी असणार आहे. तसेच सुर्वे जंक्शन व रझाक जंक्शन वरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी. तसेच बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंगला बंदी असेल.

या मार्गावरुन वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी मुभा राहील
पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सि.लीक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथुन धारावी टी जंक्शनवरून कुर्ल्याकडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील. संत ज्ञानेश्वर मार्गावरुन आयकर विभा जंक्शनकडून बिकेसी-कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने तसेच गुरुनानक हॉस्पीटल जवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरून पुढे कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथुन युटर्न घेवून शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथुन सरळ पुढे धारावी टी जंक्शन पुढे वरून कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील. सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील. पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे मार्गस्थ होतील.

हे सुद्धा वाचा

मेट्रो 2 अ प्रकल्पातील कामचुकार कंत्राटदारांना केवळ 36 लाखांचा दंड; माहिती अधिकारातून बाब उघड

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

मुस्लिमांबाबत जपून बोलत जा ! मोदींचा भाजप नेत्यांना सल्ला


पश्चिम उपनगरांमधील रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१९) रोजी दुपारी १२.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग व सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. यामध्ये रुग्णवाहिका, स्कुल बसेस, इतर बसेसना या नियमातून वगळण्यात आले आहे. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए मैदान आणि मेट्रो ७ मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानका दरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास बंदी असणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी