27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमुंबईउंदीर मारण्यासाठी बनवला विषारी टोमॅटो, महिलेकडून सेवन

उंदीर मारण्यासाठी बनवला विषारी टोमॅटो, महिलेकडून सेवन

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीय आला आहे. यामध्ये उंदीर मारण्यासाठी तयार केलेला विषारी टोमॅटो महिलेनेच खाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मड आयलंडवरील पास्कल वाडी येथे ही घटना घडली आहे असून या विचित्र घटनेवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला ही तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. तिला लगेचच रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. हा मृत्यू अपघाती असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी आणखी तपास केला असता धक्कादायक खुलासा झाला.

पोलिस तपासात असे लक्षात आले की, महिलेने घरातील उंदराला मारण्यासाठी टोमॅटोला विषारी औषध लावले होते, परंतु त्या टोमॅटोकडे उंदराने ठुंकूनही पाहिले नाही, त्यामुळे टोमॅटो तसाच राहिला. दरम्यान ती महिला स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी आली आणि नकळतपणे जेवणात तिने विषारी टोमॅटोचा तिने वापर केला. जेवणातून विष गेल्याने महिलेचा मृत्यू झाला.

महिला बेशुद्ध असल्याचे समजून शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शताब्दी रुग्णालयातच महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात आणखी तपास करण्यासाठी त्या महिलेची लाळ जतन करण्यात आली आहे. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

हे सुद्धा वाचा…

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

खरंच…. कोरोना लस घेतल्यास 5000 रुपये मिळणार?

आजपासून मुख्यमंत्री शिंदेंचा महाराष्ट्र दौरा, पूरग्रस्तांना मिळणार दिलासा?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!