32 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरमुंबईMumbai Crime : बोरिवलीत दोन दरोडेखोरांना पोलिसांनी घातल्या बेड्या

Mumbai Crime : बोरिवलीत दोन दरोडेखोरांना पोलिसांनी घातल्या बेड्या

बोरिवली पूर्व येथील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बोरिवलीत एका एटीएमवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने सध्या मुंबईतील अनेक लोकं हे आपल्या कुटुंबासमवेत शहराच्या बाहेर गेले आहेत. याचाच फायदा घेत चोरांच्या अनेक टोळ्या मुंबईत सक्रिय झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे (Crime) घडल्याची माहिती देखील समोर येत आहे. बोरिवली (Borivali) पूर्व येथील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बोरिवलीत एका एटीएमवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली आहे. परंतु या चोरांच्या टोळीतील तिघे जण पसार झाले आहे. ज्यांचा कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यावेळी कस्तुरबा मार्ग पोलसांनी अटक केलेल्या दोन चोरांकडून दरोडा टाकण्यासाठी त्यांनी आणलेले साहित्य जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरबा मार्ग पोलिसांना काही लोकांची एक टोळी ही बोरिवली पूर्व येथील बडोदा बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून ज्या ठिकाणी दरोडा पडणार आहे त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी कस्तुरबा मार्ग पोलिसांना बडोदा बँकेच्यासमोर अंधारात काही व्यक्ती हे रिक्षाने येताना दिसले.

बडोदा बँकेच्यासमोर आलेले हे व्यक्ती बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना यावेळी जाणवून आले. तसेच त्यांच्या हालचाली देखील संशयास्पद वाटू लागल्याने कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. परंतु यावेळी अंधाराचा फायदा घेत या टोळीतील तीन आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले. फरार आरोपींचा कस्तुरबा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

IPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे कारण…

Uber taxi : उबेर टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विमान चुकले; कोर्टाने कंपनीला ठोठावला दंड

MNS Ameya Khopkar : मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमेय खोपकरांना हिंदूंनी फटकारले

या घटनेत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी प्रकाश चव्हाण (वय वर्ष 22) आणि करण चव्हाण (वय वर्ष 21) या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर राहुल काळे (वय वर्ष 22) गोविंद काळे (वय वर्ष 45) आणि गोपी चव्हाण (वय वर्ष 21) हे तीन आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान, यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी आणलेली पक्कड, गॅस कटर, लोखंडी तार कटर आणि स्क्रू ड्रायव्हर हे साहित्य जप्त केले आहे.

या घटनेचा अधिक तपास कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे आणि त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. तर दिवाळीच्या निमित्ताने घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यासाठी अनेक चोरांच्या टोळ्या सक्रिय होतात. तसेच अनेक चोरीच्या घटना देखील घडतात, त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!