29 C
Mumbai
Thursday, August 3, 2023
घरमुंबईप्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवा- जयंत पाटील यांची मागणी

प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवा- जयंत पाटील यांची मागणी

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याच्याकडून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सहा मोबईल संच जप्त केले असून त्याने त्यातील डाटाची वासलात लावली आहे. अशी माहिती एटीएसच्या निदर्शनास आली आहे. असे असताना आज (3 आॉगस्ट) विधानसभेत प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याने देशातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे समोर आले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा. देशद्रोहाचा खटला का चालवला जात नाही, अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. प्रदीप कुरुलकर याला एटीएसने काही दिवसांपूर्वी अटक केली. देशातील अत्यंत महत्त्वाची माहिती देशाबाहेर पाठवणाऱ्या व्यक्तीवर ऑफिशियल सिक्रेट अॅक्टअंतर्गत खटला सुरू आहे. मात्र हा खटला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत का चालवला गेला नाही असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.
हे सुद्धा वाचा
रानकवी ना. धों. महानोर यांचे निधन
नगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांची विधानसभेत रंगली जुगलबंदी
बीडीडी चाळीत वाढलेल्या मुलाने बॉलीवुडला हवेली, महालांचे भव्य दर्शन घडविले

या अधिकाऱ्यावर हनीट्रॅपमध्ये अडकून एका पाकिस्तानी महिलेला देशाच्या गुप्त माहिती इतर देशांना पुरवल्याचा आरोप आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की,  या अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या संदर्भात या व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी विधानसभेत केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी