छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वराज्य आणि सुराज्याची भावना आजच्या भारतात डबल इंजिन सरकारमध्ये प्रभावशाली ठरत आहे. मागील काळात डबल इंजिन सरकार नसल्याने कामांमध्ये अडथळे आले मागच्या काळात गरीबांचा पैसा, करदात्यांच्या पैशाबाबत आपण संवेदनशील नव्हतो, अशी घणाघाती टीका मागील सरकारवर करतानाच आता मात्र डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होत आहे, मुंबई देशाची धडकन आहे. शिंदे आणि देवेंद्रची जोडी तुमची स्वप्ने साकार करेल हा विश्वास आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Prime Minister Modi criticized the previous government from the Rally in Mumbai)
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. त्याच्या उपस्थितीत आज बिकेसी मैदानावर भव्य सभा झाली. तसेच मोदींच्या हस्ते मेट्रो ७ आणि २ ‘अ’ चे देखील उद्घाटन झाले. यावेळी मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात करत मुंबईकरांना साद घातली. यावेळी मोदी म्हणाले, या आधी आपण केवळ गरीबीवरच चर्चा करत होतो. आपण जगाकडे मदतीची याचना करुन कसेतरी आपली गरज भागवत होतो. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारताने आता मोठी स्वप्ने पहायला सुरु केली असून ती स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद देखील निर्माण केली आहे.
Memorable day for Mumbai! Speaking at launch of multiple development initiatives benefiting the citizens of this vibrant city. https://t.co/B5yy73uIYH
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2023
हे सुद्धा वाचा
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग
PHOTO : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाबासकी
पुण्यात येत्या रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन
यावेळी मोदी यांनी यावेळी फेरीवाल्यांसाठी राबविलेल्या स्वनिधी योजनेचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले स्वनिधी योजना स्वाभीमानाची जडीबु्ट्टी आहे. डिजीटल ट्रेनिंगसाठी मुंबईत सव्वा तीनशे कॅम्प लावले. त्यामुळे फेरीवाले डिजीटल व्यवहार करु लागले. देशभरात ५० हजार कोटींचे डिजीटल व्यवहार केले. ही निराशावाद्यांसाठी मोठी चपराक आहे. अशक्य काहीच नाही. सबका प्रयास या भावनेतून मुंबईला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहोत. फेरीवाल्यांना माझे सांगणे आहे, तुम्ही दहा पाऊले चाला मी ११ पाऊले चालेन. मला भरोसा आहे छोट्या लोकांच्या परिक्षमामुळे देश वेगळ्या उंचीवर जाईल.