25 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमुंबईMLA Pratap Sarnaik : शिंदेंच्या सरनाईकाचा 'प्रताप' उघडकीस; 11 कोटींच्या संपत्तीवर येणार...

MLA Pratap Sarnaik : शिंदेंच्या सरनाईकाचा ‘प्रताप’ उघडकीस; 11 कोटींच्या संपत्तीवर येणार जप्ती

बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर लवकरच ईडीकडून जप्ती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रताप सरनाईक यांच्या 11.4 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.

शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या डोक्यावरील ईडीची (ED) तलवार हटल्याचे सर्वांना वाटले होते. ईडीच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करता सत्ता स्थापन केल्याचे देखील बोलले गेले. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या सत्ता स्थापनेनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आली. परंतु असे असले तरी शिंदे गटातील काही आमदारांच्या डोक्यावरील ईडीची टांगती तलवार पूर्णतः टाळली नसल्याचेच दिसून येते. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या संपत्तीवर लवकरच ईडीकडून जप्ती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रताप सरनाईक यांच्या 11.4 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण ?
एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 2013 साली एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली. एनएसईएल घोटाळा प्रकरणी या कंपनीच्या संचालकांसह इतर 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरु केली गेली. या चौकशीमध्ये या घोटाळ्यात गुंतवण्यात असलेली गुंतवणुकीची रक्कम आरोपींकडून थकीत असलेल्या कर्जाची परतफेड, रियाल इस्टेट आणि इतर कामांसाठी बेकायदेशीररीत्या वापरल्याचे समोर आले. जवळपास 13 हजार लोकांनी या कंपनीत पैसे गुंतवले होते.

दरम्यान, ईडीच्या तपासात आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे निष्पन्न झाले होते. आस्था ग्रुपकडून सन 2012-13 या कालावधीत 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी देण्यात आले होते. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडयांच्याकडे वळविण्यात आले होते. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

Chandrakant Patil : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसीप्रमाणे मिळणार या सुविधा!

ShivSena : राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची गर्जना होणार?; प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?

Nitin Raut : पोलिसांची दंडेली! माजी मंत्री नितीन राऊत यांना मोठी दुखापत

तसेच ईडीने केलेली कागदपत्रांची तपासणी आणि त्यांना मिळालेली माहिती आदींच्या आधारे ईडीकडून प्रताप सरनाईक यांचे ठाणे येथील दोन फ्लॅट आणि मिरा रोड येथील जमिनीचा काही भाग जप्त करण्यात आला होता. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ही 11.35 कोटी रुपये असून पीएमएलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते.

ईडीकडून संपूर्ण चौकशी करण्यात आल्यानंतर आता प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर लवकरच जप्ती येणार आहे. परंतु ईडी ही भाजपची मक्तेदारी असल्याचे बोलले जात असतानाच शिंदे गटातील आमदारावर ईडीकडून करण्यात येणारी कारवाई आता चर्चेचा विषय ठरलेली आहे. तसेच शिंदे गटातील ईडीच्या रडारवर असलेल्या आमदारांवर देखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे का ? असा प्रश्न आता यामुळे निर्माण झालेला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!